Mukesh Ambani यांची मोठी झेप! Disney सोबत करारानंतर आता 42 अब्जांचा सौदा

| Updated on: Mar 15, 2024 | 10:56 AM

Mukesh Ambani | रिलायन्स समूहने आणखी एक कंपनी खिशात घातली आहे. गेल्या काही वर्षात अनेक देशी आणि जागतिक ब्रँड रिलायन्सच्या झोळीत पडले आहे. डिस्नेशी करार झाल्यानंतर आता पॅरामाऊंट ग्लोबलसोबत सौदा झाला आहे . हा करार 42 अब्ज रुपयांचा झाल्याचे समोर येत आहे.

Mukesh Ambani यांची मोठी झेप! Disney सोबत करारानंतर आता 42 अब्जांचा सौदा
ही कंपनीचा हिस्सा पण रिलायन्सच्या पदरात
Follow us on

नवी दिल्ली | 15 March 2024 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे कंपनीचा विस्तार करत आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक जागतिक ब्रँड आणि देशातील स्टार्टअप्स एकतर या समूहात दाखल झाले आहेत अथवा त्यांनी हातमिळवणी केली आहे. रिलायन्स क्रिकेटच्या कुंभमेळ्यावेळीच डिस्नेशी करार करुन बाजी पलटवली होती. त्यानंतर मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रात अजून मोठे धमाके करण्याचा कंपनीचा विचार आहे. त्यातच कंपनी रिलायन्स वायकॉम-18 मीडियामध्ये पॅरामाऊंट ग्लोबलमधील वाटा खरेदीची तयारी करत आहे.

वायकॉम-18 मध्ये 13 टक्के वाटा

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजने डिस्ने सोबत करार (Reliance-Disney Deal) केला होता. रिलायन्स ज्वाईंट व्हेंचरमध्ये 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या करारानंतर मीडिया सेक्टरमध्ये दबदबा वाढविण्यासाठी रिलायन्स चेअरमनने आणखी एक पाऊल टाकलं आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज वायकॉम-10 मध्ये ग्लोबल पॅरामाऊंटचा 13.01 टक्के वाटा खरेदी करेल.

हे सुद्धा वाचा

मोठ्या गुंतवणुकीसाठी रिलायन्स तयार

गेल्या काही दिवसांतील वृत्तानुसार, पॅरामाऊंट ग्लोबल इंडिया मीडिया ज्वाईंट व्हेंचरमधील त्यांचा हिस्सा रिलायन्सला विक्री करण्याच्या विचारात आहे. अर्थात याविषयीची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली नाही. पण वृत्तानुसार, वायकॉम-18 मीडियामध्ये पॅरामाऊंट ग्लोबलची एकूण हिस्सेदारी खरेदीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजला एकूण 517 दशलक्ष डॉलर वा जवळपास 42 अब्ज रुपयांहून अधिकची रक्कम खर्च करावी लागेल.

अमेरिकन कंपनीने दिली ही माहिती

वृत्तानुसार, पॅरामाऊंट ग्लोबलशी संबंधित हा करार, डिस्नेसोबतच्या रिलायन्सच्या करारानंतर पूर्णत्वास येऊ शकतो. रिलायन्स आणि पॅरामाऊंट वायकॉम-18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड अगोदरच भागीदारीत आहेत. ते या क्षेत्रात टीव्ही चॅनल्सचे मालक आहेत. अमेरिकन कंपनीने बुधवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, पॅरामाऊंट प्रोगामिंग परवाना वायकॉम-18 देणार आहे. सध्या वायकॉम-18 कडे एकूण 40 चॅनल्स आहेत. त्यात पॅरामाऊंटची पण हिस्सेदारी आहे. हा करार झाला तर रिलायन्स समूहाचा मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठा दबदबा वाढेल.  या क्षेत्रात रिलायन्स मांड ठोकेल.