
ॲप्पलची भारतातील घौडदौड सुरुच आहे. महसूलात Apple ने मोठी झेप घेतली आहे. भारतात कंपनीचे उत्पादनं हातोहात विक्री होत असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. Apple चे CEO Tim Cook या घडामोडींमुळे आनंदीत झाले आहे. मी खूप खूप आनंदी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. कंपनीने भारतात महसूल वृद्धीत दुहेरी आकडा गाठला आहे. ॲप्पलची ही घौडदौड जगातील अनेक ब्रँड्ची भारताकडे पाहण्याचा नजर बदलवणारी आहे. आगामी काळात त्याचा देशाला मोठा फायदा होऊ शकतो.
कूक तर जाम खुश
भारतात अपार संधी
टीम कूक गेल्या वर्षी भारतात आले होते. त्यांनी मुंबईसह दिल्लीत ॲप्पल स्टोअरचे सुरु केली होती. त्यावेळी त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली होती. भारतात अपार संधी आहेत. आम्ही व्यवसाय वाढविणाऱ्यावर आणि विक्रीवर भर देत असल्याचे कूक यांनी सांगितले. व्यवसाय वृद्धीवर काम करत असल्याचे ते म्हणाले. भारतात एक इकोसिस्टिम तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे कूक म्हणाले. त्यामुळे ॲप्पल देशात लवकरच इतरत्र पण स्टोअर उघडण्याची शक्यता आहे.
भारत पावला
चीन सोडून भारतात उत्पादन सुरु करणाऱ्या Apple ला सुरुवातीला व्यवसायाची शंका होती. पण कंपनीची ही शंका पहिल्याच महिन्यात हवा झाली. कंपनीला भारतात जोरदार प्रतिसाद मिळाला. त्या जोरावर कंपनीने 14 दशलक्ष डॉलर उत्पादनाचा रेकॉर्ड गेल्यावर्षी नावावर केला होता. कंपनीची भारतातील घौडदौड सुरुच आहे.