अ‍ॅक्वागार्ड वॉटर प्युरिफायर बनविणारी कंपनी विकणे आहे!; कर्ज फेडण्यासाठी मोठा निर्णय

| Updated on: Sep 10, 2021 | 6:29 PM

वास्तविक शापूरजी पालोनजी समूहात कर्जाचा मोठा बोजा आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, समूहावर सुमारे 20 हजार कोटींचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत कंपनीला आपले कर्ज कमी करायचे आहे आणि बांधकाम व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

अ‍ॅक्वागार्ड वॉटर प्युरिफायर बनविणारी कंपनी विकणे आहे!; कर्ज फेडण्यासाठी मोठा निर्णय
अ‍ॅक्वागार्ड वॉटर प्युरिफायर बनविणारी कंपनी विकणे आहे!; कर्ज फेडण्यासाठी मोठा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : घरोघरी वॉटर प्युरिफायर बनवणाऱ्या युरेका फोर्ब्स(Eureka Forbes)ची आता विक्री सुरू आहे. अमेरिकन इक्विटी फर्म अॅडव्हेंट इंटरनॅशनल(Advent International) ही कंपनी खरेदी करणार आहे. युरेका फोर्ब्स शापूरजी पलोनजी ग्रुप ((SP Group))च्या 17 कंपन्यांपैकी एक आहे. असे मानले जाते की हा करार सुमारे 5000 कोटी रुपयांचा असेल. एसपी ग्रुपचे सायरस मिस्त्री एकेकाळी टाटा समूहाचे अध्यक्ष होते. नंतर रतन टाटा यांच्याशी त्यांचा वाद सर्वांना माहित आहे. (Aquaguard water purifier will be sold, this company will buy)

युरेका फोर्ब्स वॉटर प्युरिफायर्स तसेच व्हॅक्युम क्लीनर तयार करते. एसपी ग्रुपने या करारासाठी स्टँडर्ड चार्टर्ड ग्रुपची निवड केली आहे. एनसीएलटी (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या फोर्ब्स आणि कंपनीच्या विलीनीकरणानंतर युरेका फोर्ब्स कंपनी स्थापन केली जाईल. विलीनीकरण मंजूर झाल्यावर ही कंपनी अॅडव्हेंट इंटरनॅशनलला विकली जाईल. युरेका फोर्ब्सची स्थापना 1982 मध्ये झाली आणि ती एसपी ग्रुपच्या 17 कंपन्यांपैकी एक आहे.

याच कंपनीचे आहे Aquaguard Water Purifier

Aquaguard Water Purifier, Euroclean Vacuum Cleaner सारखे ब्रँड या कंपनीचे आहेत. सध्या या कंपनीचे 35 देशांमध्ये 20 दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीची एकूण उलाढाल 2857 कोटी रुपये होती.

20 हजार कोटींचा कर्जाचा मोठा बोजा

वास्तविक शापूरजी पालोनजी समूहात कर्जाचा मोठा बोजा आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, समूहावर सुमारे 20 हजार कोटींचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत कंपनीला आपले कर्ज कमी करायचे आहे आणि बांधकाम व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे आहे. अहवालानुसार, एकूण 20 हजार कोटींच्या कर्जापैकी 12 हजार कोटींचे कर्ज सध्या रिझर्व्ह बँकेच्या कोविड रिलीफ स्कीम अंतर्गत येते. याअंतर्गत, कंपनीला 2023 पर्यंत हे थकीत करायचे आहे. तथापि, कंपनीला पुढील काही महिन्यांत त्याचे निम्मे पैसे द्यावे असे वाटते. म्हणूनच युरेका फोर्ब्सची निर्गुंतवणूक केली जात आहे.

आणखी अनेक कंपन्या विकण्याची तयारी

युरेका फोर्ब्स व्यतिरिक्त, शापूरजी पल्लोनजी समूह अधिक निधी उभारण्यासाठी स्टर्लिंग अँड विल्सन सोलर, अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर काही रिअल इस्टेट मालमत्ता विकण्याची तयारी करत असल्याचे मानले जाते. इन्व्हेस्टमेंट फर्म वॉरबर्ग पिंकस(Warburg Pincus) आणि स्वीडिश घरगुती उपकरणे उत्पादक इलेक्ट्रोलक्स(Electrolux) देखील युरेका फोर्ब्स खरेदी करण्याच्या शर्यतीत असल्याचे मानले जाते. (Aquaguard water purifier will be sold, this company will buy)

इतर बातम्या

बापरे! चीनमध्ये डासांची फॅक्ट्री, आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास; ड्रॅगनचा नेमका गेम काय?

Amazfit Sale : कमी किंमतीत दमदार स्मार्टवॉच खरेदीची संधी