Video | विमानाच्या पंखाला लटकून तालिबान्यांची मस्ती, नवा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का ?

तालिबान्यांचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तालिबान्यांनी विमानच्या पंखाला दोरी बांधली आहे.

Video | विमानाच्या पंखाला लटकून तालिबान्यांची मस्ती, नवा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का ?
taliban video

मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये हंगामी सरकारची स्थपना केली आहे. त्यांनी सरकार स्थापले असले तरी येथील व्यक्तीस्वातंत्र्य आणि महिला अत्याचाराच्या घटना ऐकूण आपले हृदय पिळवटून निघत आहे. तालिबान्यांकडून पत्रकार, महिला तसेच मुलांवर केल जाणारा अत्याचार सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. या भागातून काही घटनांना ऐकून आपण हादरून जात आहोत. तर काही घटना या आपल्याला चकित करुन सोडणाऱ्या आहेत. सध्या तर तालिबान्यांचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तालिबानी विमानाच्या पंखाला लटकून झोका खेळत आहेत. (talibani swinging and playing by hanging rope on airplane video went viral on social media)

विमानावर दोरी टाकून खेळत आहेत झोका

मागील अनेक दिवासापासून तालिबानमध्ये सुरु असलेला हिंसाचार हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे. राशिया, अमेरिका, चीन तसेच भारत हे महत्त्वाचे देश तालिबानच्या कारभारावर वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबान्यांचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तालिबान्यांनी विमानच्या पंखाला दोरी बांधली आहे. दोरी बांधून ते मस्तपैकी झोका खेळताना दिसत आहेत. तालिबान्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानमधील तालिबानी दिसत आहेत. त्यांनी विमानाच्या पंखांना दोरी बांधली आहे. तसेच दोरी बांधून ते मस्तपैकी झोका खेळत आहेत. यापूर्वीदेखील त्यांचे असेच काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. व्यायामशाळा तसेच इतर अनेक ठिकाणचे व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत होते. व्हिडीओमध्ये दिसणारे विमान हे अमेरिकेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान सुरु नसल्यामुळे त्याचा काही अपयोग नाही. कदाचित याच कारणामुळे तालिबानी विमानाच्या पंखासोबत झोका खेळत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा @JBaghwan या ट्विटर अकाऊंवटर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

इतर बातम्या :

Video | लग्न थाटामाटात, पण सासरला जाताना खवळली, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

वाह, नशीब असावे तर असे! ज्या दिवशी दुकान उघडले, त्याच दिवशी 7 कोटींच्या लॉटरीने नशीबही पालटले!

Video | वाढदिवशी आईने दिलं असं गिफ्ट की मुलाच्या डोळ्यात पाणी तरळलं, नेटकरीही भावूक

(talibani swinging and playing by hanging rope on airplane video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI