AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | वाढदिवशी आईने दिलं असं गिफ्ट की मुलाच्या डोळ्यात पाणी तरळलं, नेटकरीही भावूक

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये आई आणि मुलाच्या भावनिक नात्याला कैद करण्यात आले आहेत. आपल्या आवडीची वस्तू वाढदिवसाची भेट म्हणून दिल्यानंतर व्हिडीओतील मुलाला झालेला आनंद या व्हिडीओमध्ये पाहण्यासारखा आहे.

Video | वाढदिवशी आईने दिलं असं गिफ्ट की मुलाच्या डोळ्यात पाणी तरळलं, नेटकरीही भावूक
mother son viral video
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 9:22 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होतो. सध्याचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी तरळलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. (mother given unique gift to his son on his birthday video went viral on social media)

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये आई आणि मुलाच्या भावनिक नात्याला दाखवण्यात आले आहे. आपल्या आवडीची वस्तू वाढदिवसाची भेट म्हणून भेटल्यानंतर व्हिडीओतील मुलाला झालेला आनंद या व्हिडीओमध्ये पाहण्यासारखा आहे. तर दुसरीकडे आपल्या मुलाची खुशी पाहून व्हिडीओतील आईचेही मन भरून आले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका मुलाचा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे दिसतेय. मुलाने टोपी, नवे कपडे असा साज चढवला आहे. त्याच्या समोर केक आहे. तर या मुलाच्या बाजूला त्याची आई उभी आहे. मुलाने केक कापल्यानंतर त्याच्या आईने त्याला एक भेटवस्तू दिली आहे. ही भेटवस्तू उघडल्यानंतर मुलगा भावूक झाला आहे. आईने भेटवस्तू म्हणून मोबाईल फोन दिल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक  

मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी आई-मुलाच्या नात्यावर भाष्य केलं आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

इतर बातम्या :

Video: पैलवानानं कुस्तीचा डाव टाकला आणि मृत्यूचा फास आवळला, कुस्तीच्या फडात नेमकं काय झालं बघा?

Video | सरकारी शाळेतील मास्तरांचा धडाकेबाज डान्स, म्हणतात ‘दिल बडा बेईमान’

VIDEO : धावत्या कारच्या खिडकीत लटकत तरुणांची स्टंटबाजी, व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या हाती

(mother given unique gift to his son on his birthday video went viral on social media)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली