Video : खट्याळ बापाची खोडकर लेक, बापाने प्रेमाने गालावर मारलं, भडकलेल्या मुलीनेही जोरात मुस्काडीत दिली!

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. तसंच नेटकरीही व्हिडिओची मजा घेत आहेत. हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील व्हायरल झाला आहे, जिथे नेटकरी त्यांच्या विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Video : खट्याळ बापाची खोडकर लेक, बापाने प्रेमाने गालावर मारलं, भडकलेल्या मुलीनेही जोरात मुस्काडीत दिली!
खट्याळ बापाच्या खोडकर लेकीचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video : कोरोना साथीच्या आजारामुळे मुलांच्या शाळा बंद झाल्यापासून, त्यांचे विविध बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, नेटकरीही ते व्हिडीओ आवडीने पाहतात. काही मजेदार मजेदार व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यकारक देखील व्यक्त करतो. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. सोशल मीडियावर काही अतरंगी गोष्टी व्हायरल होतात. आता सोशल मीडियावर एका बाप लेकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. म्हटलं तर तो व्हिडीओ व्हायरल आहे… कारण नेटकरी तो व्हिडीओ पाहून हसतायत तर व्हिडीओमधला बाप मात्र लेकीच्या कृत्याने ओशाळला आहे. बापाने छोट्या लेकीला प्रेमाने गालावर मारलं तर भडकलेल्या मुलीने वडिलांनाच जोरदार थप्पड मारली.

व्हिडीओमध्ये काय?

वास्तविक हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील किरिक अड्डाच्या पेजवर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही घरात एकाच ठिकाणी बसले आहेत आणि तिचे वडील आपल्या लहान मुलीसोबत मजा करत आहेत. मुलीचे वडील तिला प्रेमाने गालावर मारतात, त्यानंतर मुलगी लगेच तिच्या वडिलांना जोरदार थप्पड मारते.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. तसंच नेटकरीही व्हिडिओची मजा घेत आहेत. हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील व्हायरल झाला आहे, जिथे नेटकरी त्यांच्या विविध प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदविताना एका नेटकऱ्याने मुलीला खट्याळ बापाची खोडकर लेक म्हटलंय. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने मुलीच्या वडिलांना सल्ला दिला आहे. तो म्हणतो, “जर तुम्ही इतक्या छोट्या मुलींशी अशी मस्ती कराल तर ते ही असेच बघून शिकत असतात… ते तुम्हालाचा फॉलो करत असतात. तुमच्या मुलीला चांगले शिक्षण द्या…” याशिवाय, बहुतेक नेटकऱ्यांनी इमोजी शेअर करुन व्हिडीओ आवडल्याचं सांगितलं आहे.

(Father Slapped the Girl Girl Same Action taken Video Viral on Social Media)

हे ही वाचा :

Video : खट्याळ बापाची खोडकर लेक, बापाने प्रेमाने गालावर मारलं, भडकलेल्या मुलीनेही जोरात मुस्काडीत दिली!

Trending Video : रस्त्याच्या मधोमध गाडी खराब झाल्यानं वधू लागली रडायला, मग पोलिसाने काय केलं ते तुम्हीच पाहा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI