Trending Video : रस्त्याच्या मधोमध गाडी खराब झाल्यानं वधू लागली रडायला, मग पोलिसाने काय केलं ते तुम्हीच पाहा

एका वृत्तानुसार इंग्लंडमध्ये राहणारी लिडिया फ्लेचर आपल्या लग्नासाठी सेंट मेरी चर्चला जात होती. या वेळी तिचे आई -वडीलही तिच्यासोबत होते. मात्र दुर्दैवानं वाटेत तिची गाडी महामार्गावर खराब झाली. (Trending Video: The bride started crying after the car broke down in the middle of the road, then you see what the police did)

Trending Video : रस्त्याच्या मधोमध गाडी खराब झाल्यानं वधू लागली रडायला, मग पोलिसाने काय केलं ते तुम्हीच पाहा


मुंबई : जेव्हा एखादी व्यक्ती प्रवासासाठी बाहेर निघते तेव्हा अनेकदा त्याची कार खराब होते. साहजिकच हे तुमच्या बाबतीतही घडलं असेलच. अनेकदा, अशा गोष्टींमुळे, लोकांचं अत्यंत महत्वाचे काम बंद होऊ शकत नाही. बरं, प्रत्येक माणसाच्या त्याच्या प्रवासाशी संबंधित त्याच्या स्वतःच्या अद्वितीय कथा असतात. पण सध्या एक अतिशय हटके कथा लोकांचं मनं जिंकत आहे.  एक महिला लग्न करणार होती आणि ती तिच्या कारमध्ये चर्चच्या दिशेने जात होती. मात्र वाटेत तिची गाडी खराब झाली. मग तिच्या बाबतीत असं काही घडलं की ज्याचा क्वचितच कोणी विचार केला असेल.

एका वृत्तानुसार इंग्लंडमध्ये राहणारी लिडिया फ्लेचर आपल्या लग्नासाठी सेंट मेरी चर्चला जात होती. या वेळी तिचे आई -वडीलही तिच्यासोबत होते. मात्र दुर्दैवानं वाटेत तिची गाडी महामार्गावर खराब झाली. ज्यामुळे ती रस्त्याच्या मधोमध रडू लागली. कोरोनामुळे फ्लेचरचं लग्न आधीच दोन वेळा पुढं ढकलण्यात आलं होतं. खरं तर, या वेळी जेव्हा फ्लेचरची गाडी बंद पडली तेव्हा तिला वाटलं की तिसऱ्यांदाही कदाचित ती लग्न करू शकणार नाही. पण यावेळी तिच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलं होतं.

पाहा काय आहे प्रकरण

पाहा व्हिडीओ

या दरम्यान, नॉर्थ वेल्सचे पोलिस निरीक्षक मॅट गेडेस त्याच मार्गावरून जात होते. जेव्हा त्यांनी तिला रस्त्याच्या मध्यभागी रडताना पाहिलं तेव्हा त्यांनी कार थांबवली. त्यानंतर मॅटनं तिला त्यांच्या कारमध्ये लिफ्ट दिली आणि तो सर्वांना चर्चमध्ये घेऊन गेला, चर्चमध्ये वर वधुची आतुरतेनं वाट पाहत होता. फ्लेचर पोलिसांच्या मदतीनं योग्य वेळी चर्च गाठलं. यानंतर त्यांचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले. आता पोलिसांचं हे औदार्य लोकांची मनं जिंकत आहेत. या जोडप्यानं वाहतूक पोलिसांना मदत केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. मॅट म्हणाला की जेव्हा तो तिथं पोहोचला तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाली होती.

संबंधित बातम्या

Video | ‘मानिके मगे हिते’ गाण्याची क्रेझ, हवाई सुंदरीचा विमानात झक्कास डान्स, व्हिडीओ व्हायरल

Video | नव्या जोडीची धमाल, नवरी-नवरदेवाने केला लग्नमंडपात डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI