Video | ‘मानिके मगे हिते’ गाण्याची क्रेझ, हवाई सुंदरीचा विमानात झक्कास डान्स, व्हिडीओ व्हायरल

तरुण या गाण्यावर शॉर्ट व्हिडीओ तसेच इन्स्टाग्राम रिल्स मोठ्या उत्साहात बनवत आहेत. एका हवाई सुंदरीनेही या गाण्यावर चक्क विमानात डान्स केलाय. या डान्सचा व्हिडीओ सोशस मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | ‘मानिके मगे हिते’ गाण्याची क्रेझ, हवाई सुंदरीचा विमानात झक्कास डान्स, व्हिडीओ व्हायरल
air hostess

मुंबई : मागील काही दिवसांपासून ‘मानिके मगे हिते’ (Manike Mage Hithe) या गाण्याने सगळ्यांना वेड लावले आहे. जवळजवळ प्रत्येक तरुण-तरुणीच्या ओठावर हे गाणे आहे. गायिका योहानी दिलोका डी सिल्वा असं हे गाणं गाण्याऱ्या गायिकेचं नाव आहे. तरुण या गाण्यावर शॉर्ट व्हिडीओ तसेच इन्स्टाग्राम रिल्स मोठ्या उत्साहात बनवत आहेत. एका हवाई सुंदरीनेही या गाण्यावर चक्क विमानात डान्स केलाय. या डान्सचा व्हिडीओ सोशस मीडियावर व्हायरल होत आहे. (beautiful air hostess dancing on manike mage hithe song video went viral on social media)

मानिके मगे हिते गाण्यावर हवाई सुंदरीचा डान्स

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आयत उर्फ़ आफरीन (Aayat Urf Afreen) डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मानिके मगे हिते हे गाणे सुरु असल्याचे दिसत आहे. त्या मधूर गाण्याच्या आफरीनने डान्स केलाय. आफरीनच्या डोक्यावर टोपी आहे. तसेच अंगात हवाई सुंदरीचा ड्रेस आहे. अशा कपड्यांमध्ये ती गोड डान्स करताना दिसत आहे.

पाहा आफरीनचा डान्स

आफरीनच्या डान्सवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांलेच पसंद केले आहे. आफरीनचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. आफरीन सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळेच तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. तसेच हवाई सुंदरीच्या या व्हिडीओवर कमेंट्ससुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | नव्या जोडीची धमाल, नवरी-नवरदेवाने केला लग्नमंडपात डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !

VIDEO : दुचाकीस्वाराचा गर्लफ्रेंडला पुढे बसवत रोमॅंटिक स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत, म्हणतात हा तर वेडेपणा’

VIDEO : चष्मा घालून मिरवणारी चिमुकली आज्जीबाई, चिमुकलीचा व्हिडीओ पाहाल तर पोट धरून

(beautiful air hostess dancing on manike mage hithe song video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI