Video | नव्या जोडीची धमाल, नवरी-नवरदेवाने केला लग्नमंडपात डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा नेमका कुठला आहे, याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये लग्नमंडपात नवरी आणि नवरदेव मजेत डान्स करत आहेत.

Video | नव्या जोडीची धमाल, नवरी-नवरदेवाने केला लग्नमंडपात डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !
bride and groom viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Sep 08, 2021 | 5:03 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हैराण होऊन जातो. लग्न समारंभातील व्हिडीओ तर मोठ्या चवीने पाहिले जातात. सध्या नवरी-नवरदेवाचा असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय. (bride and groom having fun dancing with each other video went viral on social media)

लग्नमंडपात नवरी आणि नवरदेवाचा मजेदार डान्स

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा नेमका कुठला आहे, याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये लग्नमंडपात नवरी आणि नवरदेव मजेत डान्स करत आहेत. डान्स करताना ते कसलीही चिंता न करता दिलखुलासपणे नाचत आहेत. दोघांचा हा डान्स पाहून नेटकरी खुश झाले आहेत.

व्हिडीओमध्ये नेमके काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरी लग्नविधी पार पाडण्यासाठी मंचावर उभे आहेत. लग्नसमारंभ सुरु होण्यास अजूनतरी वेळ आहे. याच फावल्या वेळेला संधी समजून नवरी आणि नवरदेवाने मस्ती करण्याचं ठरवलं आहे. नवरदेवाने आपल्या होणाऱ्या बायकोसमोरच दिलखेच डान्स केला आहे. तर नवरदेवाला पाहून नवरीसुद्धा चांगलीच थिरकली आहे. नवरीने आपल्या नवरदेवासोबतच ठुमके मारत डान्स केला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नव्या जोडीचा हा डान्स समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच लोक नव्या जोडीचा हा डान्स सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. व्हायरल होणारा डान्स सध्या इन्स्टाग्रामवर witty_wedding अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

VIDEO : दुचाकीस्वाराचा गर्लफ्रेंडला पुढे बसवत रोमॅंटिक स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत, म्हणतात हा तर वेडेपणा’

VIDEO | बुडाखाली आग, उकळत्या पाण्याच्या कढईत ध्यानस्थ मुलगा, जुना व्हिडीओ व्हायरल, नेटिझन्सकडून ट्रिकचा भांडाफोड

VIDEO : चष्मा घालून मिरवणारी चिमुकली आज्जीबाई, चिमुकलीचा व्हिडीओ पाहाल तर पोट धरून हसाल

(bride and groom having fun dancing with each other video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें