खेडमध्ये वृद्धावर तरसाचा हल्ला, नशीब बलवत्तर म्हणून तरुण धावला मदतीला

जंगलाजवळ असणाऱ्या रस्त्याने जाणाऱ्या वृद्धावर एका तरसाने हल्ला (Hyena attack) केल्याची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियात (social media) चांगलाच व्हायरल (video viral) झाला आहे. एका तरुणाने या तरसाला पिटाळून लावले.

खेडमध्ये वृद्धावर तरसाचा हल्ला, नशीब बलवत्तर म्हणून तरुण धावला मदतीला
जुन्नरजवळ वृद्धावर तरसाचा हल्ला.

खेड : जंगलाजवळ असणाऱ्या रस्त्याने जाणाऱ्या वृद्धावर एका तरसाने हल्ला (Hyena attack) केल्याची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियात (social media) चांगलाच व्हायरल (video viral) झाला आहे. एका तरुणाने या तरसाला पिटाळून लावले. त्यामुळे वृद्धाचा जीव वाचला. (Hyena attack on a man walking on road video goes viral on social media)

नाशकातल्या सिन्नर भागात अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातही बिबट्याने अनेक प्राण्यांचा फडशा पाडल्याची घटना ताजी आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षित अधिवासात मानवाने अतिक्रमण केल्यामुळे ते शहर आणि गावात घुसत आहेत. त्यामुळे अशा घटनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खेड तालुक्यातील एका जंगलातील रस्त्याने एक वृद्ध चालले होते. तेव्हा त्यांच्यावर पाठिमागून आलेल्या तरसाने हल्ला केल्याचे समोर आले आहे. वृद्ध व्यक्ती आपल्याच तंद्रीत होती. अचानक झालेल्या हल्ल्याने ते गोंधळून गेले. त्यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला. मात्र, तरसाने पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. हे पाहता तिथे असलेला एक तरुण त्यांच्या मदतीला धावला. त्याने तरसाला मारहाण करून पिटाळून लावले.

VIDEO :

प्रतिक्रियांचा पाऊस

सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एका यूजरने, वृद्धाला वाचवण्यासाठी तरुणाने धाव घेतली. त्यामुळे तरस पळून गेला. वृद्धाचा जीव वाचला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या युजरने, नशीब बलवत्तर म्हणून तरुण मदतीला आला. त्याने तरसाला पळवून लावले आणि वृद्धाचा जीव वाचला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी मानवाने जंगलावर अतिक्रमण केल्यामुळे असे प्रकार होत असल्याचे म्ंहटले आहे.

तरस सापडला मृत

वृद्धावर हल्ला करणारा तरस मृत सापडल्याचे समजते. या तरसाला कशाचा तरी संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, खेड तालुक्यात तरसांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात अशा घटना घडू शकतात. (Hyena attack on a man walking on road video goes viral on social media)

इतर बातम्याः

नाशकासाठी अतिवृष्टीचा अलर्ट, जिल्ह्याला पावसाने झोडपले

बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI