VIDEO : धावत्या कारच्या खिडकीत लटकत तरुणांची स्टंटबाजी, व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या हाती

खिडकीच्या काचा खाली करुन त्यावर बसत तीन युवक लटकलेले या व्हिडीओत दिसत आहेत. चालत्या कारमध्ये मुलांनी केलेल्या दंगामस्तीचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट झाल्यानंतर व्हायरल झाला आहे.

VIDEO : धावत्या कारच्या खिडकीत लटकत तरुणांची स्टंटबाजी, व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या हाती
ठाणे परिसरात स्टंटबाजी
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 1:06 PM

मुंबई : कित्येक वेळा स्टाईल मारण्याच्या नादात काही जण अशी स्टंटबाजी करतात, की त्यांना आपण कायदा हातात घेत असल्याचंही भान उरत नाही. पण ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा स्टंटबाजांना धडा शिकवणं पोलिसांसाठी सोपं झालं आहे. कारण या घटनांची माहिती तात्काळ ट्विटरद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचते. असाच काहीसा प्रकार ठाणे परिसरात पाहायला मिळाला. काही तरुण चालत्या कारमधून बाहेर लटकत बॉलिवूड गाण्यांवर दंगा करत होते. यावेळी एका प्रवाशाने त्यांचा व्हिडीओ शूट केला आणि ट्विटरवरुन मुंबई पोलिसांकडे तक्रार केली.

काय आहे प्रकरण?

आदिल शेख नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला. मुंबई पोलिसांना टॅग करत त्याने लिहिलं आहे, की “हा व्हिडिओ जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर मुंब्रा-कोसा परिसरातील आहे. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया त्यांच्यावर त्वरित कारवाई करा” आदिलने या व्हिडीओसह पत्ता आणि वाहन क्रमांकाची संपूर्ण माहिती दिली आहे. मुंबई पोलीस अशा प्रकरणांमध्ये खूप सतर्क असतात. त्यांनी आदिलच्या ट्विटर हँडलला लगेच उत्तर दिले आणि लिहिले की “सर, तुमची तक्रार ठाणे शहर पोलिसांकडे पाठवण्यात आली आहे”

काय आहे व्हिडीओमध्ये

तक्रारदार आदिलने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की “सर, अशा लोकांमुळे खूप त्रास होतो. ही समस्या एका दिवसापुरती नाही. अशा लोकांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे” खिडकीच्या काचा खाली करुन त्यावर बसत तीन युवक लटकलेले या व्हिडीओत दिसत आहेत. चालत्या कारमध्ये मुलांनी केलेल्या दंगामस्तीचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट झाल्यानंतर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत शेकडो व्ह्यूज आले आहेत. मुंबई पोलीस ट्विटरवर खूप सक्रिय असतात. कोणतीही तक्रार आल्यास मुंबई पोलिस त्यावर तत्काळ कारवाई करतात. युझरला ते प्रतिसाद देतात, की आपली तक्रार संबंधित ठिकाणी कारवाईसाठी घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे व्हिडीओ आणि ट्विटही अनेकदा व्हायरल होताना दिसतात.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान करणाऱ्या स्टंटबाजांना काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. वाकोला वाहतूक पोलिसांच्या तक्रारीनंतर ओंगळवाणं प्रदर्शन करणाऱ्या तरुणांबाबत विलेपार्ले पोलिसांनी कारवाई केली होती. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वेगवान गाडीबाहेर लटकून दारु पिणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ समोर आला होता. मागील खिडकीच्या काचा खाली करुन त्यावर बसत दोन युवक मद्यपान करत असल्याचं यामध्ये दिसत होतं. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करुन त्यांच्या अटकेची मागणी केली जात होती.

संबंधित बातम्या :

VIDEO : स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात, अतिउत्साही तरुणांचा कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी

VIDEO : एकाच्या हातात स्टेअरिंग, दोघांचं अर्ध धड बाहेर, तिसरा थेट पुढच्या काचेला लटकलेला, तरुणांचं जीवघेणं स्टंट

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.