Video | सरकारी शाळेतील मास्तरांचा धडाकेबाज डान्स, म्हणतात ‘दिल बडा बेईमान’

सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान शिक्षकाने उर्जेने ओतप्रेत असा डान्स केला आहे. 'बेईमान दिल बडा बेईमान' या हिंदी गाण्यावर हा शिक्षक डान्स करताना दिसत आहे. डान्स पाहून नेटकरी चकित झाले आहेत

Video | सरकारी शाळेतील मास्तरांचा धडाकेबाज डान्स, म्हणतात 'दिल बडा बेईमान'
TEACHER DANCE


मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ तर अतिशय मजेदार असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ हे प्राणी, पक्षी तर काही व्हिडीओ हे माणसांच्या करामतीचे असतात. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ तर एका शिक्षकाचा आहे. या शिक्षकाने हिंदी गितावर मजेदार डान्स केलाय. या डान्सचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (sikkim government school teacher dancing energetically video went viral on social media)

शिक्षकाचा उर्जेने ओतप्रोत डान्स

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चर्चेता आलेला हा व्हिडीओ सिक्कीम राज्यातील एका सरकारी शाळेतील आहे. या शाळेमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे दिसतेय. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान शिक्षकाने उर्जेने ओतप्रोत असा डान्स केला आहे. ‘बेईमान दिल बडा बेईमान’ या हिंदी गाण्यावर हा शिक्षक डान्स करताना दिसत आहे. डान्स पाहून नेटकरी चकित झाले आहेत.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

नेटकरी डान्सने प्रभावित, व्हिडीओवर मजेदार कमेंट्स

या व्हिडीओमध्ये शिक्षक शाळेच्या मैदानात काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट अशा साध्या वेशात आहे. वेश जरी साधा असला तरी या शिक्षकाच्या अंगी सर्वांना चकित करुन सोडणारे गुण आहेत. शिक्षकाच्या याच गुणांमुळे नेटकरी प्रभावित झाले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या मजेदार व्हिडीओला शेअर करत आहेत. सध्या चर्चेत आलेल्या व्हिडीओला फेसबुकच्या Viva La Danza या पेजवर पाहता येईल.

इतर बातम्या :

VIDEO : धावत्या कारच्या खिडकीत लटकत तरुणांची स्टंटबाजी, व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या हाती

Video | ‘मानिके मगे हिते’ गाण्याची क्रेझ, हवाई सुंदरीचा विमानात झक्कास डान्स, व्हिडीओ व्हायरल

VIDEO  : स्कूटीमध्ये लपून बसला होता खतरनाक किंग कोब्रा, पाहा कसं केलं रेस्क्यू?

(sikkim government school teacher dancing energetically video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI