Video: पैलवानानं कुस्तीचा डाव टाकला आणि मृत्यूचा फास आवळला, कुस्तीच्या फडात नेमकं काय झालं बघा?

कुस्तीच्या सामन्यादरम्यान एका पैलवानाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली. मुरादाबाद जिल्ह्यातील फरीदनगर येथील हा प्रकार असून कुस्तीदरम्यान गतप्राण झालेल्या पैलवानाचे नाव महेश असे आहे.

Video: पैलवानानं कुस्तीचा डाव टाकला आणि मृत्यूचा फास आवळला, कुस्तीच्या फडात नेमकं काय झालं बघा?
uttar pradesh moradabad


मुरादाबाद : कुस्तीच्या सामन्यादरम्यान एका पैलवानाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली. मुरादाबाद जिल्ह्यातील फरीदनगर येथील हा प्रकार असून कुस्तीदरम्यान गतप्राण झालेल्या पैलवानाचे नाव महेश असे आहे. या घटनेनंतर मुरादाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या जीवघेण्या कुस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (uttar pradesh moradabad dangal wrestler died while wrestling video went viral on social media)

कुस्ती खेळताना पैलवानाचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार मुरादाबाद येथील फरीदनगर येथे एका कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कुस्तीमध्ये उधमसिंह नगरामधील गंगापूर येथील रहिवासी महेश या पैलवानानेदेखील सहभाग घेतला. महेशचा सामना फरीदनगर येथील साजिद अंसारी या स्थानिक पैलवानाशी सुरु होता. यावेळी अंसारी या पैलवानाने महेश पैलवानच्या मानेला करकरचून दाबले. तसेच त्याला मातीमध्ये आदळून मान पकडली. यामध्ये महेशची मान मोडली आणि महेश पैलवान आखाड्यातच गतप्राण झाला.

पैलवानाच्या मृत्यूच्या बदल्यात 60 हजार रुपये

कुस्तीची स्पर्धा 2 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. महेश पैलवानाचा मृत्यू झाल्यानंतर यावेळी सगळीकडे खळबळ उडाली होती. मात्र, येथील पंचायतीने पैलवानाच्या बदल्यात कुटुंबीयांना 60 हजार रुपये दिले. मात्र पैलवानाच्या मृत्यूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याने चांगलाच जगहब उडाला आहे. व्हिडीओमध्ये पैलवान जागीच ठार झाल्याचे दिसतेय.

(हा व्हिडीओ India24 या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला आहे.)

पोलीस म्हणतात तक्रार आल्यानंतर तपास करु

दरम्यान, मुरादाबाद येथे पैलवानाचा मृत्यू झाला असला तरी त्याबाबतची कुठलीही तक्रार अद्याप आलेली नाही, असे येथील एसपी देहात विद्या सागर यांनी सांगितले. तक्रार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास केला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

Video | सरकारी शाळेतील मास्तरांचा धडाकेबाज डान्स, म्हणतात ‘दिल बडा बेईमान’

VIDEO : धावत्या कारच्या खिडकीत लटकत तरुणांची स्टंटबाजी, व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या हाती

Video : खट्याळ बापाची खोडकर लेक, बापाने प्रेमाने गालावर मारलं, भडकलेल्या मुलीनेही जोरात मुस्काडीत दिली!

(uttar pradesh moradabad dangal wrestler died while wrestling video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI