तुमचा-आमचा बादशाह मसाला… कंपनीचा मोठा निर्णय, आता ‘या’ ब्रँडकडे मालकी!

| Updated on: Oct 27, 2022 | 10:53 AM

सध्या दोन्ही कंपन्यांत झालेल्या करारानुसार, बादशाह मसाले कंपनीचे एकूण मूल्य 1,152 कोटी रुपये होते. आता कंपनीने एक घोषणा केली आहे.

तुमचा-आमचा बादशाह मसाला... कंपनीचा मोठा निर्णय, आता या ब्रँडकडे मालकी!
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः तुमच्या-आमच्या घरात वापरला जाणारा बादशाह मसाला (Badshah Masala). हा मसाला बनवणाऱ्या कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपले शेअर्स विक्रीला काढला आहेत. डाबर इंडिया (Dabad India) हा ब्रँड (Brand) आता मसाले विक्रीची तयारी करतोय. डाबरने आता बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ५१ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी पक्कं अॅग्रीमेंट केलंय.

ही डील झाल्यानंतर बादशाह मसाल्यांवर डाबर इंडिया कंपनीचा मालकी हक्क प्रस्थापित होईल. दोन्ही कंपन्यांच्या एका जॉइंट वक्तव्यातून ही माहिती पुढे आली आहे.

दैनंदिन वापरातील उत्पादनांना FMCG असे म्हणतात. यापैकीच डाबर इंडिया कंपनीने आता मसाले विक्रीची तयारी सुरु केली आहे. सप्टेंबर तिमाहीचे रिझल्ट कंपनीने नुकतेच जारी केले. यात बादशाह मसाल्यांची भागीदारी खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली.

डाबरने बादशाह मसाल्यांत 51% भागीदारी घेण्यासाठी 587.52 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांकडून एक संयुक्त पत्रक जारी झालंय. त्यात 51 टक्क्यांच्या भागीदारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येतंय. या करारानंतर बादशाह मसाल्यांवर डाबर इंडियाची मालकी येईल.

काळा मसाला, मिक्स मसाला आणि इतर खाद्य पदार्थ बादशाह मसाल्यांकडून विक्री केला जातो. या मसाल्यांची निर्यातही होते. डाबर इंडियाने शेअर मार्केटला याविषयीची माहिती दिली.

फूड सेक्टरच्या नव्या कॅटेगरीत प्रवेश करण्याचा डाबरचा उद्देश आहे. त्यानुसारच हे पाऊल उचलण्यात आलंय.

सध्या दोन्ही कंपन्यांत झालेल्या करारानुसार, बादशाह मसाले कंपनीचे एकूण मूल्य 1,152 कोटी रुपये होते. सध्या 51 टक्के भागीदारी डाबर इंडियातर्फे घेतली जाईल. तर उर्वरीत 49 % भागीदारी पाच वर्षानंतर घेतली जाईल. पुढील तीन वर्षात डाबर इंडियाचा फूड बिझनेस 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा उद्देश आहे.