AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक वाजताच भरारी पथक धडकलं… घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी; महाराष्ट्रातील या शहरात मोठी धडक कारवाई

इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सिलेंडरची कमतरता भासत असल्याने गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्यात... महाराष्ट्रातील या शहरात मोठी धडक कारवाई

एक वाजताच भरारी पथक धडकलं... घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी; महाराष्ट्रातील या शहरात मोठी धडक कारवाई
| Edited By: | Updated on: Mar 11, 2026 | 3:06 PM
Share

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक सिलिंडर घेतल्यानंतर 25 दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ऑनलाईन बुकिंग करताना अनेकांना क्रमांक उपलब्ध नसल्याचा मेसेज येत आहे. ही सर्व परिस्थिती इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे निर्माण झाली आहे. तर हैराण करणारी गोष्ट म्हणजे, भरारी पथकाने घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी टाकल्या आहेत. नागपुरात काळाबाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न पुरवठा विभागाकडून आज नागपुरात वेगवेगळ्या भागात धाडसत्र राबवण्यात आलंय.

गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि अवैध साठेबाजांवर आळा बसावा, म्हणून अन्न पुरवठा विभागाने वेगवेगळ्या भागात धाड टाकलीय. सकाळी 12.30 वाजता नागपूरातील सिव्हील लाईन परिसरात HP च्या गॅस एजन्सीवर छापा टाकण्यात आलाय. या गॅस एजन्सीमध्ये किती स्टॅाक आहे? कुणाला सिलेंडरचं वितरण झालंय? व्यावसायिक सिलेंडरचा साठा किती आणि प्रत्येक वितरण आणि उपलब्ध साठा याची माहिती तपासण्यात आलीय. अन्न आणि पुरवठा विभागाच्या पाच अधिकाऱ्यांच्या टीमने ही धाड टाकली.

नागपूरातील जरीपटका भागातील एचपीच्या गॅस गोडाऊनवर अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी एक वाजता दुसरी रेड केलीय. डोमेस्टीक गॅस अँड एप्लायंसेस या एजन्सीच्या गोडाऊनवर हा छापा टाकण्यात आलाय. या रेडमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा आढळून आलाय. एकीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण बंद असताना, या गॅस गोडाऊनमध्ये साधारणतः पाच किलो वजनाचे साधारण 50 व्यावसायिक सिलेंडर आढळून आले. हे सिलेंडर नेमके कुठून आले? कशासाठी साठा केला? याची बाब अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासली.

अन्न पुरवठा अधिकारी विनोद वाघदे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरातील गॅस एजन्सी, गॅस गोडाऊनसह वेगवेगळ्या भागातील हॅाटेलवरही अन्न पुरवठा विभागाचा वॅाच आहे. गॅस पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आलाय. याच पार्श्वभुमीवर नागपूरात अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी छापेमारी केलीय.

मध्य पुर्वेत युद्धामुळे नागपूरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे. या दरम्यान कोणी काळाबाजार केल्यास थेट फौजदारी कारवाईचा इशारा नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन ईटनकर यांनी दिलाय. गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार थेट गुन्हा दाखल होणार आहे. गॅस सिलिंडरचा अवैध साठा आहे का? याची तपासणी करण्यासाठी येत्या काळात धाडसत्र सुरुच राहणार आहे…. असा इशारा देखील विपीन ईटनकर यांनी केलाय.

Follow Us
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका