Bank News : सोमवार ते शुक्रवारच बँकिंग? खासगी बँक कर्मचाऱ्यांची 5 डे वर्किंगची मागणी, पण RBI चा निर्णय काय?

सध्या बँकांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टीचा असतो, तर इतर शनिवार सामान्यतः कामकाजाचे दिवस असतात. मात्र सर्व शनिवार सुट्टी करून पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्याची मागणी सुरू आहे

Bank News : सोमवार ते शुक्रवारच बँकिंग? खासगी बँक कर्मचाऱ्यांची 5 डे वर्किंगची मागणी, पण RBI चा निर्णय काय?
bank news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 5:59 PM

संपूर्ण आठवडा आपण कामात बिझी असतो त्यामुळे बँकेत जायला वेळचं मिळत नाही. त्यामुळे पहिला तिसरा आणि पाचव्या शनिवारी बँकेत बरीच गर्दी असते. त्यातच आता प्रायव्हेट बँक कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शनिवार- रविवार सुट्टीची मागणी केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसमोर बँकेची काम आता वर्किंग डे मध्ये करायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झालाय. बँकेच्या या मागणीबद्दल  जाणून घ्या सविस्तर

बँक कर्मचाऱ्यांची काय आहे मागणी

प्रायव्हेट आणि सरकारी या दोन्ही बँकां पहिला,तिसरा आणि पाचवा शनिवार या चालू असतात. तर दुसरा आणि चौथा शनिवार बँका बंद असतात. पण आता तो नियम बदलण्याची मागणी प्रायव्हेट बँकिंग सेक्टर मधील कर्मचारी करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना आठवड्यातील 5 दिवस सोम ते शुक्र हे वर्किंग हवे आहेत, तर आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी हवी आहे.

Loading...

बँकांना विकेंड मिळणार का?

आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खासगी बँकांना त्यांच्या इच्छेनुसार विकेंड मिळू शकतो का ?  तर याचं उत्तर आहे नाही. कारण खासगी बँका या स्वत:च्या इच्छेनुसार शनिवार- रविवार सुट्टी नाही लागू करू शकत. या बँका जरी खासगी क्षेत्रात मोडत असल्या तरी त्यांनाही RBI च्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. जर 5 डे वर्किंग आणि प्रत्येक शनिवार रविवारी सु्ट्टी हवी असेल तर RBI आणि सरकार कडून मंजूरी मिळणे आवश्यक असते.

या मागणीचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. 2024 मध्ये IBA ने पाच दिवसांच्या कामकाजाचा प्रस्तावर मंजूर करून तो पुढे पाठवलाही होता, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.सरकारकडूनही कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

त्यामुळे सध्या ग्राहकांनी प्रत्येक शनिवार बँक बंद असेल असे गृहीत धरू नये. अंतिम निर्णय होईपर्यंत पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार कामकाजाचा दिवस राहणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us