हातात शेणाचा गोळा, मातीची जमीन… प्रसिद्ध अभिनेत्री सारवतेय जमीन, पारंपारिक अंदाज पाहून चाहते फिदा
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री घरातील जमीन सारवताना दिसत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते कौतुक करत आहेत.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. तिने अभिनय कौशल्यावर अनेकांची मने जिंकली आहेत. माधवी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सध्या सोशल मीडियावर माधवीचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
माधवी कायमच सोशल मीडियावर कोकणातील आठवणी शेअर करताना दिसते. माधवीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. तिचे मातीचे जमीन असलेले घर शेणाने सरवताना दिसत आहे. तिचे हे घर कोकणातील असल्याचे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर माधवीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
नेमका काय आहे व्हिडीओ?
माधवी तिच्या गावी गेली आहे आणि तिचे घर हे अतिशय जुन्या पद्धतीचे आहे. कौलारु घर, शेणाने सारवलेली जमीन, लाकडची शिडी असलेला पोट माळा अशा सुंदर घरात आहे माधवी. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माधवी आधी जमिनीवरील कचरा गोळा करताना दिसते. ती पाटीत शेण घेते. त्यानंतर त्यात पाणी मिसळून कालवून घेते. माधवी या शेणाने जमीन सारवताना दिसत आहे. ती घरातील एक संपूर्ण भाग सारवून घेते. दरम्यान, माधवीने शॉर्ट जिन्स पँट आणि टी-शर्ट घातला आहे. तिचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
माधवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने मस्त मॅडम खूप छान, बोलायचं तात्पर्य म्हणजे एवढं तुम्ही आता कम्फर्टेबल आहात म्हणजे पैसे जे काय आहे ते असून सुद्धा तुम्ही शेणामध्ये सार्वताय, खूप मस्त वाटला असाच साधेपणा जपून ठेवा अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने मस्त…खूप सुंदर वाटलं तुम्हाला शेण सारवून रांगोळी काढताना बघून असे म्हटले आहे.
माधवी निमकरविषयी
माधवी ही प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच सोबतच तिचा फिटनेस कायम चर्चेत असतो. ती सोशल मीडियावर योग करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. तसेच ती एक उद्योजिका देखील आहे. तिचा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे.
