AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिशान बंगले, भव्य रस्ते, वाळवंटातील नंदनवन; पाकिस्तानमधील श्रीमंत हिंदूचे गाव कोणते?

Pakistan Richest Hindu City: पाकिस्तानमध्ये हिंदूं बहुसंख्य असलेली काही गावं, जिल्हे आणि शहरं आहेत. सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील या शहरात पाकिस्तानमधील श्रीमंत हिंदू राहतात. हे शहर आलिशान बंगले, मोठे रस्ते आणि मोठी मंदिरांसह मशि‍दीसाठी तिथं प्रसिद्ध आहे.

आलिशान बंगले, भव्य रस्ते, वाळवंटातील नंदनवन; पाकिस्तानमधील श्रीमंत हिंदूचे गाव कोणते?
पाकिस्तानमधील श्रीमंत हिंदूचे गाव कोणते?
| Updated on: Nov 19, 2026 | 1:10 PM
Share

Pakistan Richest Hindu City: पाकिस्तानमध्ये हिंदू समाज अल्पसंख्याक आहे. या देशात हिंदूंवर अन्यायाच्या अनेक बातम्या समोर येतात. पण त्याचवेळी काही वेगळी माहितीही समोर येते. पाकिस्तानातील एक समृद्ध शहर आहे. तिथे श्रीमंत हिंदू कुटुंब राहतात. या ठिकाणी त्यांची मोठमोठे आलिशान बंगले, भव्य रस्ते आणि मोठ्या मंदिरासह मशिदी आढळतात. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील ‘मिठी’ (Tharparkar- Mithi) असं या शहराचं नाव आहे. वैभवशाली जीवनशैलीमुळे हे शहर पाकिस्तानात प्रसिद्ध आहे. थारच्या वाळवंटी प्रदेशात वसलेले हे शहर शांतताप्रिय आणि स्वच्छतेसाठी ओळखले जाते.

आलिशान बंगले, मोठे रस्ते

मिठी हे शहर थारपारकर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पाकिस्तानातील बोटावर मोजण्याइतक्या बहुसंख्य हिंदू असलेल्या शहरांपैकी हे एक आहे. हे शहर आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. येथे श्रीमंत हिंदू राहतात. ते पेशाने डॉक्टर, वकील, उद्योजक आणि व्यापारी आहेत. हे शहर भव्य आहे आणि इथले आलिशान बंगले, मोठे रस्ते हा पाकिस्तानातील चर्चेचा विषय आहे. स्वच्छ व मोठे रस्ते, सुबक इमारती, गजबजलेली बाजारपेठ यामुळे इथे पर्यटकांचीही मोठी गर्दी असते. येथील सुबत्ता पाहता हे वाळवंटाजवळील शहर आहे, यावर विश्वास बसत नाही.

देवी-देवतांची मंदिरं

या शहरात प्राचीन आणि विशाल मंदिरं आहेत. इथं श्रीकृष्ण मंदिर, शिव मंदिर आणि इतर काही देवी-देवतांची सुंदर मंदिरं आहेत. इथे दिवाळी, होळी, कृष्णजन्माष्टमी, नवरात्र असे उत्सव साजरे होतात. या काळात हे शहर रोषणाईने न्हाऊन निघते. या शहरातील मशिदीही भव्य आहेत. इथं हिंदू आणि मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहत आलेला आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारे हे शहर आहे. या शहरात गुन्हेगारीचे प्रमाणही अल्प आहे. शेजारी वाळवंट असला तरी या शहरात सुबत्ता नांदते. हे शहर पाहण्यासाठी पाकिस्तानातूनच नाही तर परदेशातूनही अनेक पर्यटक येतात. पर्यटन हा अनेक लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. या व्यतिरिक्त इतरही काही भागात हिंदू बहुसंख्य आहेत.

Follow Us
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय