
तुम्हाला पैशांची गरज असली की तुम्ही नेमकं काय करतात? FD तोडता का? की FD वर कर्ज घेता? आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती सांगणार आहोत.मपैशाची गरज कुणालाही केव्हाही भासू शकते. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने आपत्कालीन परिस्थितीसाठी नेहमीच निधी तयार ठेवला पाहिजे, जेणेकरून कठीण काळात पैशांची सहज व्यवस्था करता येईल.
दुसरीकडे, गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर बहुतेक लोक गुंतवणुकीसाठी बँक FD चा आधार घेतात. बँक FD मध्ये गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय मानला जातो.
अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत लोकांकडे इमर्जन्सी फंड नसतो पण त्यांच्याकडे बँकेत FD असते. अनेक जण बँकेची FD फोडून पैशांची व्यवस्था करतात, तर अनेक जण बँकेच्या FD वर कर्ज घेऊन पैशांची व्यवस्था करतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा बँक FD तोडणे अधिक फायदेशीर असते किंवा बँक FD वर कर्ज घेणे अधिक फायदेशीर असते. चला जाणून घेऊया.
जेव्हा तुम्ही बँकेची FD अकाली मोडता तेव्हा त्यावर तुम्हाला प्री-फिक्स्ड इंटरेस्ट रेट रिटर्न मिळत नाही. म्हणजेच जितक्या लवकर तुम्ही FD फोडता तितके तुम्हाला FD वर मिळणारे व्याज कमी होईल. अशावेळी FD तोडल्यास तुमचा नफा कमी होईल. याशिवाय अनेक बँका मुदतपूर्व FD तोडल्यास 1 टक्के दंडही आकारतात.
जेव्हा तुम्ही FD वर कर्ज घेता तेव्हा तुम्हाला हे कर्ज सामान्य कर्जापेक्षा खूप स्वस्त मिळतं. FD वरील कर्जाचे व्याजदर FD च्या व्याजदरापेक्षा 1 ते 2 टक्के जास्त असतात. अशा परिस्थितीत तुमचे कर्ज स्वस्त होईल.
जर तुम्ही FD तोडून कर्ज घेतले नाही तर तुमची बचत म्हणजेच तुमची FD सुरक्षित राहते. तुम्ही नंतर कर्जाची परतफेड कराल. त्याचबरोबर तुमची FD तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित राहील. याशिवाय जर तुमची FD परिपक्व होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतील तर तुम्ही FD तोडण्याचा विचार करू शकता कारण या परिस्थितीत तुमचे नुकसान कमी होईल.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)