बँकेकडून कर्ज हवे असेल तर ‘या’ ३ चुका टाळा, अन्यथा…

बँक कर्ज देण्यापूर्वी आपला क्रेडिट स्कोअर तपासते. जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर सहज कर्ज मंजूर होते. मात्र तुम्ही पुढील चुका केल्या तर बँक तुम्हाला कधीही कर्ज देणार नाही.

बँकेकडून कर्ज हवे असेल तर या ३ चुका टाळा,  अन्यथा...
bank loan
| Updated on: Jun 08, 2025 | 4:35 PM

आपल्यापैकी सर्वांनी बँकेकडून कर्ज घेतले असेल. काहीजण वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज किंवा वाहन कर्ज घेतो. बँक कर्ज देण्यापूर्वी आपला क्रेडिट स्कोअर तपासते. जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर सहज कर्ज मंजूर होते. मात्र काहीवेळा चुका झाल्याने क्रेडिट स्कोअर खराब होतो त्यामुळे बँक कर्ज देत नाही. आज आपण अशा ३ सामान्य चुकांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, या चुका तुम्ही केल्या तर बँक तुम्हाला कधीही कर्ज देणार नाही.

पहिली चूक – वेळेवर ईएमआय न भरणे

तुम्ही तुमच्या सध्याच्या कर्जाचा किंवा क्रेडिट कार्डचा ईएमआय वेळेवर भरत नसाल तर तुम्ही पहिली आणि सर्वात मोठी चूक करत आहात. ईएमआय भरण्यास ३० दिवसांचा विलंब झाला तर तुमचा क्रेडिट स्कोअर 50 ते 100 गुणांनी कमी होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमात क्रेडिट अॅक्सेससाठी वेळेवर पेमेंट भरलेले असणे अनिवार्य आहे. जर तुम्ही वेळेवर EMI भरला नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होईल आणि तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळू शकणार नाही.

दुसरी चूक – क्रेडिट कार्डचा जास्त वापर

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ३०% पेक्षा जास्त वापरलात तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. यातून बँकेला असे समजते की, तुम्ही कर्जावर जास्त अवलंबून आहात. यामुळे भविष्यात तुम्हाला महागड्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागू शकते.

तिसरी चूक – जुनी क्रेडिट खाती बंद करणे

लोक अनेकदा त्यांचे जुने क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्ज घेतलेली खाती बंद करतात. मात्र असे केल्याने तुमची क्रेडिट हिस्ट्री कमी होते, ज्यामुळे स्कोअर कमी होतो. यामुळे बँक कर्ज देताना विलंब करु शकते किंवा तुम्हाला कर्ज नाकारू शकते.

क्रेडिट स्कोअरची श्रेणी आणि त्याचा अर्थ

  • ३०० ते ५७९ – खराब क्रेडिट, कर्ज नाकारण्याची शक्यता
  • ५८० – ७३९ योग्य क्रेडिट , कर्ज उच्च व्याजदराने मिळू शकते
  • ७४० – ९०० उत्कृष्ट क्रेडिट, त्वरित कर्ज मंजुरी

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी काय करावे?

  • कर्जाचा ईएमआय वेळेवर भरा
  • क्रेडिट कार्ड मर्यादेपेक्षा कमी खर्च करा
  • एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करू नका
  • कर्जाचा बोजा कमी करा