ICICI Bank कडून ग्राहकांना अलर्ट, लवकर अपडेट करा मोबाईल अ‍ॅप नाहीतर…

ICICI Bank कडून ग्राहकांना अलर्ट, लवकर अपडेट करा मोबाईल अ‍ॅप नाहीतर...

मुंबई : देशातली सर्वात मोठी खाजगी बँक आयसीआयसीआय बँक ( ICICI Bank ) त्यांच्या ग्राहकांना सतत इशारा देत आहे. आयमोबाईलद्वारे (iMobile) तातडीने खातं अरडेट करण्यासंधी बँक ग्राहकांन सूचित करत आहे. असं झालं नाही तर 20 जानेवारीनंतर तुम्हाला अॅप वापरता येणार नाही. कोरोनाच्या काळातील आयमोबाईल ग्राहकांचा मोठा आधार होता. या दरम्यान, मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार वाढले. […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 19, 2021 | 11:14 AM

मुंबई : देशातली सर्वात मोठी खाजगी बँक आयसीआयसीआय बँक ( ICICI Bank ) त्यांच्या ग्राहकांना सतत इशारा देत आहे. आयमोबाईलद्वारे (iMobile) तातडीने खातं अरडेट करण्यासंधी बँक ग्राहकांन सूचित करत आहे. असं झालं नाही तर 20 जानेवारीनंतर तुम्हाला अॅप वापरता येणार नाही. कोरोनाच्या काळातील आयमोबाईल ग्राहकांचा मोठा आधार होता. या दरम्यान, मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार वाढले. त्यामुळे बँकेने हा निर्णय घेतला आहे. (banking news update your icici bank imobile app today to more benefits)

यासंबंधी बँक त्यांच्या ग्राहकांना वारंवार सतर्क मेसेज पाठवत आहे. “प्रिय ग्राहक, तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे जुने आयमोबाईल अ‍ॅप वापरत असाल तर याची सेवा 20 जानेवारीपासून थांबवण्यात येणार आहे. यासाठी लवकरात लवकर अॅप अपडेट करा. जेणेकरून तुम्हाला व्यवहारामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला 20 जानेवारीआधी हे अपडेट करणं महत्त्वाचं असल्याचं बँकेने मेसेजमध्ये म्हटलं आहे.

कसं कराल अपडेट

जर तुम्ही अजूनही iMobile चा जुना अॅप वापरत असाल तर काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला काही मिनिटांत हा अॅप अपडेट करता येईल. सगळ्यात आधी आयमोबाईलवर लॉग इन करा. यासाठी पिन टाकताच बँकेचा मेसेज तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही Google Play Store च्या iMobile वर पोहोचाल. तिथे गेल्यावर पुन्हा अपडेट या बटणावर क्लिक करा. यानंतर काही मिनिटांतच तुमचा अॅप अपडेट होईल.

आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुम्ही मोबाइल अ‍ॅपद्वारे पैसे पाठवणं, पैसे भरणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी करू शकता. तुम्ही क्रेडिट कार्ड भरणं, युटिलिटी पेमेंट, ओला उबर बिलं भरणं यासारख्या दैनंदिन गोष्टीसुद्धा या अॅपद्वारे करू शकता. इतकंच नाही तर या अ‍ॅपद्वारे तुम्ही एफडी आणि इतर ठेव खाती देखील उघडू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. (banking news update your icici bank imobile app today to more benefits)

संबंधित बातम्या – 

Post Office Scheme: अवघ्या 5 वर्षात मिळणार 21 लाख, 100 रुपयांनी सुरू करू शकता गुंतवणूक

यंदाच्या हंगामातली पहिला हापूस आंबा पुणे मार्केटात दाखल, पेटीचा भाव 25 हजार रुपये

कमी पैशात PNB मध्ये करा सुरक्षित गुंतवणूक; एकाच खात्यामध्ये आकर्षक व्याज, कर्जाची सुविधा

(banking news update your icici bank imobile app today to more benefits)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें