मंगळवारी बँका असणार बंद! पाच दिवसाचा आठवडा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप

पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले असल्याने उद्या मंगळवारी बँकांचे कामकाज ठप्प होणार असल्याने ग्राहकांना मनस्ताप भोगावा लागणार आहे.

मंगळवारी बँका असणार बंद! पाच दिवसाचा आठवडा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप
bank strike 2026
| Updated on: Jan 26, 2026 | 11:05 PM

पाच दिवसांचा आठवडा करण्याचा नियम लागलीच लागू करण्यासह अन्य मागण्यासाठी यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स (यूएफबीयू)यांनी उद्या २७ जानेवारीला राज्यभरातील बँकांचा संप पुकारल्याने सरकारी बँकांच्या कामकाज प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी ९ संघटनांच्या संयुक्त समिती असलेल्या यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने (यूएफबीयू)संपाचे आव्हान केले आहे. २३ जानेवारी रोजी श्रम आयुक्तांशी झालेली बोलणी फिस्कटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २५ जानेवारी (रविवार ), २६ जानेवारी ( प्रजासत्ताक दिन ) बँका बंद होत्या. त्यामुळे आता मंगळवारी संपामुळे ग्राहकांचे हाल होणार आहेत.

संघटनांचे म्हणणे काय ?

या बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतरही आमच्या मागण्यांवर कोणतेही आश्वासन मिळाले नाही.यासाठी आम्ही संप करण्यास मजबूर झालो आहोत असे यूएफबीयूचा घटक असलेल्या अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ (एआयबीयए) चे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले. मार्च २०२४ मध्ये वेतन सुधारणा करारानुसार इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) आणि यूएफबीयू यांच्या दरम्यान सर्व शनिवारी बँकांना सुट्टी जाहीर करण्यावर सहमती झाली होती असे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआयबीओसी) चे महासचिव रुपम रॉय यांनी सांगितले.

खाजगी बँकांवर परिणाम नाही

भारतीय स्टेट बँक (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बँक ऑफ बडोदा सह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखामध्ये रोख जमा, पैसे काढणे, चेक वटवणे आणि प्रशासकीय कामांवर परिणाम होणार आहे.मात्र, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एक्सिस बँक अशा खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँकांच्या कामांवर परिणाम होणार नाही असे म्हटले जात आहे. कारण या बँकांच्या संघटनांनी संपात सहभाग घेतलेला नाही.