AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; केंद्र सरकारकडून GPF च्या नव्या दरांची घोषणा

GPF Provident Fund | GPF हा प्रोव्हिडंट फंड खासप्रकारच्या कर्मचाऱ्यांनाच लागू होतो. निवृत्तीवेळी याचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनातील काही पैसे GPF खात्यामध्ये टाकावे लागतात.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; केंद्र सरकारकडून GPF च्या नव्या दरांची घोषणा
7th pay commission
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 12:27 PM
Share

नवी दिल्ली: केंद्र सरकारने नुकतेच सप्टेंबर तिमाहीसाठी जनरल प्रोव्हिडंट फंडाच्या (GPF) नव्या व्याजदरांची घोषणा केली. त्यानुसार आता खातेधारकांना 7.1 टक्के इतके व्याज मिळेल. जनरल प्रोव्हिडंट फंडावरही PPF आणि PF प्रमाणे फायदा मिळतो. मात्र, केंद्र सरकारने गेल्या सहा तिमाहींपासून GPF च्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारने हा व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता. (Big News for government employees new intrest rates of gpf announced)

GPF हा प्रोव्हिडंट फंड खासप्रकारच्या कर्मचाऱ्यांनाच लागू होतो. निवृत्तीवेळी याचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनातील काही पैसे GPF खात्यामध्ये टाकावे लागतात. तर काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी GPF बंधनकारक आहे. या खात्यात साठवलेले पैसे निवृत्तीनंतर संबंधित कर्मचाऱ्याला दिले जातात. संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर हे पैसे त्याच्या वारसदाराला मिळतात. GPF खात्यावर घेतलेल्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही.

GPF व्याजदर कोणत्या योजनांसाठी लागू होणार?

1. जनरल प्रोव्हिडंट फंड (सेंट्रल सर्विसेज) 2. कॉन्ट्रिब्यूटरी प्रोव्हिडंट फंड 3. ऑल इंडिया सर्विसेज प्रोव्हिडंट फंड 4. स्टेट रेलवे प्रोव्हिडंट फंड 5. इंडिया नेवल डॉकयार्ड वर्कमॅन प्रोव्हिडंट फंड 6. डिफेंस सर्विसेज ऑफिसर्स प्रोव्हिडंट फंड 7. द आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रोव्हिडंट फंड 8. जनरल प्रोव्हिडंट फंड (डिफेन्स सर्विस) 9. इंडियन ऑर्डनेंस डिपार्टमेंट प्रोव्हिडंट फंड 10. इंडिया ऑर्डनेंस फॅक्टरीज वर्कमॅन प्रोव्हिडंट फंड

संबंधित बातम्या:

PPF नव्हे तर ‘हा’ आहे पैसे वेगाने दुप्पट करण्याचा सोप्पा मार्ग

‘आधार’वरुन अवघ्या तीन दिवसात पीएफ काढणं शक्य!

करोडपती व्हायचंय, मुच्युअल फंडमध्ये योग्य गुंतवणूक करुन 20 वर्षांनंतर मिळवा परतावा

(Big News for government employees new intrest rates of gpf announced)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.