AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG ग्राहकांसाठी मोठी अपडेट! हा मॅसेज दाखवल्याशिवाय घरपोच नाही मिळणार सिलेंडर

LPG Cylinder Rules: 1 ऑगस्ट 2026 रोजीपासून इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या कोट्यवधि ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसंबंधीच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. ऑईल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला किंमतीत बदल करतात. यावेळी किंमतीसह e-KYC आणि डिलिव्हरी प्रक्रियेवर थेट परिणाम होईल.

LPG ग्राहकांसाठी मोठी अपडेट! हा मॅसेज दाखवल्याशिवाय घरपोच नाही मिळणार सिलेंडर
LPG ग्राहकांसाठी मोठी अपडेट
| Updated on: Jul 30, 2026 | 3:40 PM
Share

देशभरातली एलपीजी ग्राहकांसाठी मोठी अपडेट आहे. 1 ऑगस्टपासून केवळ किंमतीत बदल होणार नाही तर e-KYC आणि डिलिव्हरी प्रक्रियेत बदल दिसेल. इंडियन ऑईल (Indane), हिंदुस्तान पेट्रोलियम (HP Gas) आणि भारत पेट्रोलियम (Bharat Gas) सारख्या सरकारी कंपन्यांनी याविषयीच्या नियमात काही बदल केले आहेत. एलजीपी बुकिंगची वेळ आणि एलपीजी सोडून पीएनजी कनेक्शन जोडणीविषयी नियमात बदल झाले आहेत. आता घरपोच गॅस सिलेंडर मिळण्यासाठी काही बदल एक तारखेपासून दिसून येतील.

1 ऑगस्टपासून काय होणार बदल?

किंमतींमध्ये मोठा बदल

सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला जागतिक बाजारातील कच्चा तेलाच्या किंमती आधारे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर जाहीर करतात. गेल्या काही महिन्यात व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या किंमतीत मोठा चढउतार पाहायला मिळाला आहे. या 1 ऑगस्ट रोजी असाच मोठा बदल दिसेल. व्यावसायिक गॅस सिलेंडरसह 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडच्या दरात फरक दिसू शकतो. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर दिसून येईल. रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यावसायिकांवर दिसेल.

e-KYC चा न‍ियम

किंमतीतील बदलासोबतच सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट एलपीजी ग्राहकांच्या e-KYC प्रक्रियेसंबंध आहे. गॅस सिलेंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात येते. इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांनी ज e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्यांना सबसिडी मिळण्यात अडथळा येईल. त्यांचे गॅस कनेक्शनही काही दिवसांसाठी बंद केले जाऊ शकते. अधिकृत मोबाईल ॲपच्या मदतीने फेस-ऑथेंटिकेशनद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

घरपोच गॅस सिलेंडर मिळण्याविषयी नियम

1 ऑगस्टपासून घरपोच गॅस सिलेंडर डिलिव्हरीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. डिलिव्हरी प्रमाणीकरण प्रणाली (Delivery Authentication Code – DAC) अधिक कडक करण्यात आली आहे. आता ग्राहकांद्वारे सिलेंडर बुकिंग केल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक वन-टाईम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. पासवर्डचा हा संदेश डिलिव्हरी बॉयला दाखवणे अनिवार्य आहे. याशिवाय सिलेंडर घरपोच मिळणार नाही. तर व्यावसायिक गॅसची ट्रॅकिंग वाढवण्यात येणार आहे. गॅसचा पुरवठा कुठे कुठे करण्यात आला, याची अपडेट एजन्सीला कंपन्यांना द्यावी लागणार आहे. सिलेंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात येणार आहे.

Follow Us
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!