3 वर्षानंतर मुकेश अंबानी इतिहास रचणार; स्वस्त पेट्रोल-डिझेलचे देणार गिफ्ट

| Updated on: Jan 24, 2024 | 9:58 AM

Mukesh Ambani | राम मंदिराच्या उद्धघाटनानंतर केंद्रीय अर्थसंकल्प आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजतील. त्यापूर्वी आशियातील अब्जाधीश आणि रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. तीन वर्षानंतर अंबानींमुळे हा इतिहास घडणार आहे.

3 वर्षानंतर मुकेश अंबानी इतिहास रचणार; स्वस्त पेट्रोल-डिझेलचे देणार गिफ्ट
Follow us on

नवी दिल्ली | 24 January 2024 : देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे अगोदरपासूनच वाहत आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वीच उभा आणि आता आडवा देश पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तर भाजप आणि मित्र पक्षांनी पण जोरदार तयारी सुरु केली आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उद्धघाटनानंतर आता भाजप लोकसभेच्या निवडणुकीसाठी वेगाने कामाला लागले आहे. अवघ्या आठवडाभरानंतर अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल. दरम्यान आशियातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी हे एक खेळी खेळणार आहेत. या तीन वर्षात जे झाले नाही, ते मुकेश अंबानी करणार आहेत. ते इतिहास रचणार आहेत. त्यांच्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते. सरकारचा भार ते कसे हलके करणार आहेत, ते पाहुयात..

हा निर्णय पडला पथ्यावर

डिसेंबर महिन्यात 5 राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. त्यावेळी पेट्रोलियम मंत्रालयाने एक निर्णय घेतला. त्यानुसार, ज्या देशांवर निर्बंध नाहीत, अशा कोणत्याही देशाकडून भारत कच्चे तेल आयात करु शकतो. त्यामुळे व्हेनेझुएला या देशाकडून तीन वर्षानंतर कच्चे तेल खरेदी करण्याची आशा पल्लवित झाली आहे. 2019 मध्ये या देशावर निर्बंध घालण्यात आले होते. ते हटल्यानंतर आता कच्चे तेल खरेदीचा निर्णय होऊ शकतो. कमोडिटी मार्केट एनालिटिक्स फर्म Kapler नुसार, खरेदीनंतर सर्वात शेवटी व्हेनेझुएलाकडून भारताला नोव्हेंबर 2020 मध्ये कच्चा तेलाची खेप पाठविण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

मुकेश अंबानी यांचा थेट संपर्क

डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा सौदा होऊ शकतो हे स्पष्ट झाले होते. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज त्यासाठी थेट सौदा करणार असल्याचे समोर आले होते. कंपनीने या देशाकडे सध्या 3 टँकर कच्चे तेल खरेदीची बुकिंग केली आहे. जानेवारी 2024 पासून हे कच्चे तेल भारतात यायला सुरुवात होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजपूर्वी नयारा एनर्जी पूर्वीपासूनच व्हेनेझुएलाकडून कच्चा तेलाची खरेदी नियमीतपणे करत होती. आता ही खेप आल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची दाट शक्यता आहे.

रशियाकडून स्वस्त कच्चा तेलाचा पर्याय

भारत सध्या रशियाकडून सवलतीत कच्चा तेलाची आयात करत आहे. पण आता ही सवलत केवळ 2 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे. तर व्हेनेझुएलाकडून देशाला 8 ते 10 डॉलर प्रति बॅरलपर्यंत स्वस्तात कच्चे तेल मिळू शकते. व्हेनेझुएला हा कच्चा तेलाची निर्यात करणाऱ्या देशांची संघटना OPEC चा सदस्य आहे.