Gold Silver Rate Today | सोने-चांदीत आली स्वस्ताई; खरेदीची लगबग करणार की नाही

Gold Silver Rate Today 24 January 2024 | सोने-चांदीचा तोरा उतरला आहे. या आठवड्यात तर सलग तीन दिवस सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. त्यामुळे अनेकांची पावलं आपोआप सराफा बाजाराकडे वळली. डिसेंबर महिन्याच्या विक्रमानंतर नवीन वर्षात सोने-चांदीत कमालीची नरमाई आली आहे.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीत आली स्वस्ताई; खरेदीची लगबग करणार की नाही
Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 8:34 AM

नवी दिल्ली | 24 January 2024 : डिसेंबर 2023 मध्ये केलेल्या विक्रमानंतर सोने-चांदीत कमालीची नरमाई आली आहे. सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. नवीन वर्षात, जानेवारी 2024 मध्ये मौल्यवान धातूत 15 दिवसांत सोन्यात 2150 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांनी पडझड झाली. इतर दिवसांमध्ये तेजीचे सत्र दिसून आले. या आठवड्यात पण या धातूंमध्ये नरमाईचे सत्र सुरु आहे. 19 आणि 20 जानेवारी रोजी सोन्यात दरवाढ झाली होती. त्यानंतर 24 तारखेपर्यंत एकतर दर स्थिर राहिले अथवा त्यात घसरण दिसली. या आठवड्यातील घसरणीने ग्राहकांची पावलं आपोआप सराफा बाजाराकडे वळली. काय आहे सोने-चांदीतील किंमतींची अपडेट (Gold Silver Price Today 24 January 2024)

सोन्याच्या किंमतींची अपडेट काय?

जानेवारी महिन्यात, सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. या 24 दिवसांत 5 ते 6 दिवस वगळले तर किंमतीत घसरण दिसून आली. सोने 2150 रुपयांनी उतरले. गेल्या आठवड्यात शुक्रवारी, 19 जानेवारी 330 रुपयांनी तर 20 जानेवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली होती. तर या सोमवारपासून किंमतीत मोठा बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत झाली घसरण

जानेवारी महिना ग्राहकांना पावला. 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान चांदी 1400 रुपयांनी महागली होती. त्यापूर्वी चांदीत 3100 रुपयांची घसरण झाली होती. 19 जानेवारीला चांदी 200 रुपयांनी वधारली. 20 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. त्यानंतर भाव जैसे थे होते. 23 जानेवारी रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीचे भाव उतरले. 24 कॅरेट सोने 62,355 रुपये, 23 कॅरेट 62,105 रुपये, 22 कॅरेट सोने 57,117 रुपये झाले. 18 कॅरेट 46,766 रुपये, 14 कॅरेट सोने 36,478 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,311 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....