Gold Silver Rate Today | अयोध्येत प्राणप्रतिष्ठेनंतर मोठा दिलासा, नाही वाढल्या सोन्या-चांदीच्या किंमती, असा आहे भाव

Gold Silver Rate Today 23 January 2024 | अयोध्येत प्रभू श्रीराम आगमनाचा आणि प्राण प्रतिष्ठेचा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. अवघे जग त्याचे साक्षीदार झाले. घसरणीचे सत्र सुरुच आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार किंमती वधारल्या होत्या. तर रविवार आणि सोमवारी ग्राहकांना दिलासा मिळाला. असा आहे सोने-चांदीचा भाव?

Gold Silver Rate Today | अयोध्येत प्राणप्रतिष्ठेनंतर मोठा दिलासा, नाही वाढल्या सोन्या-चांदीच्या किंमती, असा आहे भाव
Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 8:39 AM

नवी दिल्ली | 23 January 2024 : या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी माहिन्यात सोने-चांदी ग्राहकांना पावले. या महिन्यात 5 ते 6 दिवस वगळता इतर दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत नरमाई दिसली. 15 दिवसांत सोन्यात 2150 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांनी पडझड झाली. अधूनमधून सोने-चांदीने चमकदार कामगिरी दाखवली. आठवड्याच्या शेवटी आणि पहिल्या दिवशी सोन्यात उसळीचा ट्रेंड दिसून आला. गेल्या आठवड्यात 19 आणि 20 जानेवारी रोजी सोन्यात दरवाढ झाली. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. सोमवारी सराफा बाजाराच्या महासंघाने सुट्टी जाहीर केल्याने भाव जाहीर झाले नाहीत. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 23 January 2024)

सोन्याचा भाव काय

5 ते 6 दिवस वगळता सोन्यात पडझड दिसून आली. सोने 2150 रुपयांनी उतरले. गेल्या आठवड्यात 16, 17 आणि 18 जानेवारीला सोने क्रमशः 100, 350 आणि 300 रुपयांनी स्वस्त झाले. तर शुक्रवारी, 19 जानेवारी 330 रुपयांनी तर 20 जानेवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. रविवारी आणि सोमवारी भावात बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा ग्राहकांना दिलासा

जानेवारी महिन्यात चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान चांदी 1400 रुपयांनी वधारली. तर त्याअगोदर चांदीत 3100 रुपयांची घसरण झाली होती. 16 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांनी, 17 जानेवारीला 600 रुपयांनी तर 18 जानेवारी रोजी भावात 400 रुपयांची घसरण झाली. 19 जानेवारीला चांदी 200 रुपयांनी वधारली. 20 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीचे भाव उतरले. 24 कॅरेट सोने 62,390 रुपये, 23 कॅरेट 62,140 रुपये, 22 कॅरेट सोने 57,149 रुपये झाले. 18 कॅरेट 46,793 रुपये, 14 कॅरेट सोने 36,498 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,228 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.