BSNL : फक्त 2,449 रुपयांचा रिचार्ज अन् 380 दिवसांची वैधता! सोबतच 1 लाखांचं अपघात विमा संरक्षण, ऑफरचा लाभ कधीपर्यंत घेता येणार ?
आता BSNL च्या ग्राहकांना फक्त एकदा रिचार्ज करून 380 दिवसांची कॉलिंग वैधता मिळणार आहे. त्यासोबतच एक खास ऑफर म्हणजेच 1 लाखांचा अपघात विमा देखील मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित काळापर्यंत लागू आहे. ऑफरचा लाभ कधीपर्यंत घेता येणार ? जाणून घ्या.

मोबाईल रिचार्ज म्हटलं की दर महिन्याला पैसे खर्च करावे लागतात. त्यात डेटा आणि कॉलिंगची सुविधाही हवी असते. पण वर्षभराची वैधता मिळाली तर ? सरकारी टेलिकॉम कंपनीच्या BSNL ने ग्राहकांसाठी अशीच एक खास ऑफर आणली आहे.
कंपनीच्या 2,449 रूपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनवर आता 365 नव्हे तर 380 दिवसांची वैधता मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनसोबत ग्राहकांना 1 लाख रूपयांचे अपघाती विमा संरक्षण देखील दिले जात आहे.
2,449 रूपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळणार? BSNL या प्लॅनची मूळ वैधता 365 दिवसांची आहे. मात्र मर्यादित कालावधीच्या विशेष ऑफरअंतर्गत ग्राहकांना 15 दिवसांची एक्स्ट्राची वैधता दिली जात आहे. त्यामुळे एकदा रिचार्ज केल्यानंतर तब्बल 380 दिवस वापरता येणार आहे.
या प्लॅनमध्ये दररोज 2GB HIGH SPEED DATA मिळतो. त्याचबरोबर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधाही आहे. दररोजचा 2GB DATA संपल्यानंतर इंटरनेट बंद होत नाही तर 40KBPS वेगाने सुरू राहते. त्यामुळे वर्षभर कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय चांगला आहे.
रिचार्जसोबत 1 लाखांचा विमा :या प्लॅनचं आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे त्यासोबत मिळणारं विमा संरक्षण, BSNL ने ओरिंएंटल INSURANCE कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्याअंतर्गत पात्र ग्राहकांना 1 लाख रूपयांपर्यंतचा अपघाती मृत्यू विमा दिला जातो. रस्ते अपघात, आगीमुळे होणारी दुखापत, सर्पदंश, वीज पडणे आणि वीजेचा धक्का लागणे अशा घटनांचा या विमा संरक्षणात समावेश आहे.
ऑफरचा लाभ कधीपर्यंत घेता येणार? :या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत 2,449 रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. प्लॅन आणि ऑफरविषयी अधिक माहिती BSNL च्या लिंकवर किंवा अॅपवर हेल्पलाईन क्रमांकावर मिळू शकते. रिचार्ज करण्यापूर्वी विम्याच्या अटी आणि पात्रतेची माहिती तपासणे आवश्यक आहे.