AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Price today : स्वस्त झालं सोनं, चांदीही घसरली; वाचा आजचे ताजे भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 140 रुपयांनी सोन्याच्या किंमती घसरल्याचं दिसतं. यामुळे आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46236 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.

Gold-Silver Price today : स्वस्त झालं सोनं, चांदीही घसरली; वाचा आजचे ताजे भाव
| Edited By: | Updated on: Feb 19, 2021 | 1:06 PM
Share

नवी दिल्ली : आज सोन्या-चांदीच्या किंमतीत घट झाल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 140 रुपयांनी सोन्याच्या किंमती घसरल्याचं दिसतं. यामुळे आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46236 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. तर चांदीही शुक्रवारी 68000 रुपये प्रति किलोवर व्यापर करत 8494 रुपयांहून कमी आहे. मागच्या सत्रामध्ये चांदी 68494 रुपए प्रति किलोवर बंद झाली होती. (buisness news gold silver price today here is the price of 10 gram on mcx)

कालही सोन्या-चांदीमध्ये घसरण झाली. गुरुवारी सराफा बाजारात सोनं 717 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सकाळी 11.30 वाजता एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 176 रुपयांनी वाढलेला दिसून आला. तर चांदीच्या वायदा भावात 88 रुपयांची उसळी नोंदवली गेलो होती. काल सोन्याचा भाव 176 रुपयांच्या वाढीसह प्रति दहा ग्रॅम 46,379 रुपयांच्या भावावर व्यापार करत होता तर एक किलो चांदीची किंमत 69183 रुपये होती.

बजेटनंतर सोन्याच्या किंमतींवर परिणाम

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात (Gold Rate) चढउतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे, दुसरीकडे लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, गुंतवणूकदारही सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचे भावही मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही

सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (buisness news gold silver price today here is the price of 10 gram on mcx)

संबंधित बातम्या – 

एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा

Petrol Diesel Price : आज मुंबईसह या शहरांमध्ये पुन्हा वाढले पेट्रोलचे भाव, वाचा आजचे दर

गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI कडून HFC चे नियम जारी

(buisness news gold silver price today here is the price of 10 gram on mcx)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली