Business Idea: कमी गुंतवणुकीत सुरू करा आईस्क्रीमचा व्यवसाय, घसघशीत कराल कमाई

10-20 हजार रुपयांची छोटी गुंतवणूक करून तुम्ही आइस्क्रीम पार्लरचा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसाय वाढताना तुम्ही अधिक गुंतवणूक करू शकता.

Business Idea: कमी गुंतवणुकीत सुरू करा आईस्क्रीमचा व्यवसाय, घसघशीत कराल कमाई
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 1:21 PM

ऋतूनुसार व्यवसाय केला तर याहून दुसरी आयडियाची कल्पना नाही. सध्या देश उष्णतेमुळे होरपळून नव्हे तर भाजून निघत आहे. देशाच्या बहुतांश भागात तीव्र उष्णतेचा (Hot session) उद्रेक झाला आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला अशा बिझनेस आयडियाज (Business Ideas) गरज आहे जी या वाईट स्थितीत ही कमाईची संधी देईल. अशा सिझनला व्यवसायात तोटा होण्याची शक्यता ही खूप कमी असते, तर फायद्याच्या अनेक संधी व्यावसायिकांना मिळतात. आपण अगदी कमी गुंतवणूकीने याची सुरुवात करू शकता. हा व्यवसाय म्हणजे आइस्क्रीम पार्लरचा (Ice Cream Parlour) आहे, तुम्हाला हे माहित आहेच की, विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीमची मागणी खूप वाढते. त्यामुळे असा सीझन इनकॅश केल्यास प्रचंड प्रमाणात फायदा होतो. हा व्यवसाय सुरू करण्यात गुंतलेल्या भांडवलाचा विचार करता 10-20 हजार रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. व्यवसाय वाढत असताना तुम्ही अधिक गुंतवणूक करू शकता. हा व्यवसाय देशाच्या प्रत्येक भागात, कानाकोपऱ्यात सुरू करता येतो. अगदी गल्ली बोळात ही तुम्ही हा व्यवसाय सुरू केल्यास त्याला गि-हाईकी महाग नाही.

अगदी छोट्या जागेत व्यवसाय

तुम्ही अगदी छोट्या जागेत म्हणजे 300-400 स्क्वेअर फूट जागेत आईस्क्रीम पार्लर उघडू शकता. यामध्ये तुम्ही 5-10 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करू शकता. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या ( FICCI ) अहवालानुसार या वर्षाच्या अखेरीस देशातील आइस्क्रीमचा व्यवसाय एक अब्ज डॉलरच्या पुढे जाईल.

15 अंकी नोंदणी क्रमांक आइस्क्रीम पार्लरसाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडून (FSSAI ) परवाना घेणे आवश्यक आहे. हा 15 अंकी नोंदणी क्रमांक आहे. हे सुनिश्चित करते की आपण येथे तयार केलेले खाद्यपदार्थ त्याच्या गुणवत्तेच्या मानकाची पूर्तता करतात. तुमच्याकडे अमूल आइस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीचा पर्यायही आहे. त्यासाठी किमान 300 चौरस फूट जागा लागणार आहे. आइस्क्रीम व्यवसायातील नफा आपण ते तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे घटक वापरत आहात यावर अवलंबून असतो.

आईस्क्रीम व्यवसायात 14 टक्के वाढीची शक्यता

www.expertmarketresearch.com या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, 2021 ते 2026 या कालावधीत आईस्क्रीम व्यवसायात 14 टक्के वाढीची शक्यता आहे. 2026 साली देशातील आईस्क्रीम व्यवसाय 442 दशलक्ष रुपयांच्या घरात जाणार आहे. 2020 साली देशातील आईस्क्रीम बाजारातील उलाढाल 201.4 दशलक्ष रुपये इतकी होती.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.