फक्त एक लाख रुपये गुंतवून सुरु करा ‘हा’ व्यवसाय, काही वर्षांनी व्हाल मालामाल, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Sep 18, 2021 | 7:55 AM

ही एकप्रकारे दीर्घकालीन गुंतवणूक असली तरी त्यामधून मिळणारा फायदाही तितकाच जास्त असतो. चंदन लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चंदनाची मागणी आपल्या देशात तसेच परदेशात खूप जास्त आहे.

फक्त एक लाख रुपये गुंतवून सुरु करा हा व्यवसाय, काही वर्षांनी व्हाल मालामाल, जाणून घ्या सर्वकाही
Follow us on

नवी दिल्ली: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रत्यक्ष शेती किंवा शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.

गावाकडे तुमची जमीन असेल तर त्यावर चंदनाची शेती हा चांगला पर्याय ठरू शकतो. ही एकप्रकारे दीर्घकालीन गुंतवणूक असली तरी त्यामधून मिळणारा फायदाही तितकाच जास्त असतो. चंदन लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चंदनाची मागणी आपल्या देशात तसेच परदेशात खूप जास्त आहे. चंदनाच्या लागवडीत तुम्ही जितका पैसा खर्च करता त्यामध्ये अनेक पटीने नफा मिळतो. यामध्ये तुम्ही अवघे लाखभर रुपये गुंतवून 60 लाखांच नफा मिळू शकता.

ग्रामीण भागातील तरुणांची चंदनाच्या शेतीला पसंती

गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागामध्ये चंदनाच्या शेतीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. चंदनाच्या लागवडीतून भरपूर नफा होतो. याच कारणामुळे आजकाल तरुणांचा नोकरीपेक्षा याकडे जास्त कल आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील एका उत्कृष्ट पांडे या तरुणाने अधिकाऱ्याची नोकरी सोडून गावात चंदनाची शेती सुरु केली. यामधून त्याला बक्कळ फायदा मिळाला. त्यामुळे ग्रामीण भागात नोकरी करण्याऐवजी चंदनाची शेती हा उत्पन्नाचा चांगला मार्ग ठरू शकतो.

चंदनाची शेती कशी कराल?

चंदनाची झाडे दोन प्रकारे तयार केली जाऊ शकतात, पहिली सेंद्रिय शेती आणि दुसरी पारंपारिक पद्धतीने. सेंद्रिय पद्धतीने चंदनाची झाडे तयार करण्यासाठी सुमारे 10 ते 15 वर्षे लागतात आणि पारंपारिक पद्धतीने झाड वाढण्यास सुमारे 20 ते 25 वर्षे लागतात. चंदनाची रोपं इतर झाडांच्या तुलनेत बरीच महाग असतात. मात्र, मोठ्याप्रमाणावर रोपं खरेदी केल्यास चंदनाचे एक रोप साधारण 400 रुपयांना पडते.

चंदनाच्या शेतीमधून कशी कमाई होते?

चंदनाच्या शेतीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळण्यास दीर्घ काळ लागतो. मात्र, यामधून मिळणारा फायदाही घसघशीत असतो. भारतात चंदनाची किंमत सुमारे 8-10 हजार रुपये प्रति किलो आहे, तर परदेशात त्याची किंमत 20-25 हजार रुपये आहे. एका झाडामध्ये सुमारे 8-10 किलो लाकूड सहज उपलब्ध होते. दुसरीकडे, जर आपण जमिनीबद्दल बोललो, तर एका एकरातील चंदनाच्या झाडापासून 50 ते 60 लाख मिळू शकतात.

संबंधित बातम्या:

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

नोकरी शोधण्यापेक्षा 70 हजारात ‘हा’ व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय, 80 टक्क्यांपर्यंत कर्ज, 6 लाखांचा निव्वळ नफा

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई