सरकारचा लाखो व्यावसायिकांना मोठा दिलासा, ‘ही’ आहे वार्षिक GST रिटर्न भरण्याची नवी मुदत

| Updated on: Mar 01, 2021 | 12:47 AM

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी वस्तू व सेवा कराचा (GST) वार्षिक रिटर्न (Annual Retruns) भरण्याची मुदत वाढवून 31 मार्चपर्यंत केलीय.

सरकारचा लाखो व्यावसायिकांना मोठा दिलासा, ही आहे वार्षिक GST रिटर्न भरण्याची नवी मुदत
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी वस्तू व सेवा कराचा (GST) वार्षिक रिटर्न (Annual Retruns) भरण्याची मुदत वाढवून 31 मार्चपर्यंत केलीय. ही केंद्राकडून दिलेली दुसरी मुदतवाढ आहे. आधी ही मूदतवाढ 31 डिसेंबर 2020 वरुन 28 फेब्रुवारी 2021 करण्यात आली होती. अर्थ मंत्रालयाने एक अधिकृत निवेदनात म्हटलं, “सरकारने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत जीएसटी रिटर्न भरताना करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचाच विचार करुन सरकारने 2019-20 साठी जीएसटी रिटर्न-9 (GSTR-9) आणि जीएसटी रिटर्न-9 सी (GSTR-9C) भरण्याची मुदत वाढवली आहे. हा निर्णय घेताना त्याला निवडणूक आयोगाचीही मंजूरी घेण्यात आलीय (Central Government again extend time limit of GST Annual Retruns).

GSTR-9 एक वार्षिक टॅक्स रिटर्न (कर परतावा) आहे. हा कर परतावा जीएसटी अंतर्गत भरावा लागतो. GSTR-9C ची रक्कम म्हणजे ऑडिट केलेला वार्षिक आर्थिक लेखाजोखा आणि जीएसटीआर-9 यांची एकत्रित रक्कम आहे. एएमआरजी अँड असोसिएट्सचे रजत मोहन केंद्राच्या या निर्णयावर म्हणतात, “ही 31 दिवसांची मुदतवाढ तशी छोटी वाढत असली तरी कर भरणाऱ्या व्यावसायिकांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे.”

व्यावसायिकांना मोठा दिलासा

केवळ 2 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा एकूण वार्षिक टर्नओव्हर असलेल्या करदात्यांसाठी वार्षिक रिटर्न भरणं अनिवार्य आहे. रिकन्सिलेशन स्टेटमेंट केवळ 5 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्यवसाय असणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिकांकडून फाईल करणं अपेक्षित आहे.

हेही वाचा :

1 मार्चपासून तुमचं आर्थिक गणित बदलणार, गॅस सिलेंडर ते बँकेच्या कामात होणार मोठे बदल

प्रत्येक महिन्याला कमवा बक्कळ पैसा, Post Office ची खास योजना, वाचा किती होणार फायदा?

लवकरच सुरू होणार अपघात पॉलिसीची विक्री, 1 कोटी रुपयांपर्यंत विमा, वाचा सविस्तर

व्हिडीओ पाहा :

Central Government again extend time limit of GST Annual Retruns