केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! AICPI-IW इंडेक्सआधारे निश्चित झाला नवा डीए, वेतनात होणार इतकी वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकीकडे आठव्या वेतन आयोगाचे वेध लागले असताना आता एक नवीन दिलासा देणारी बातमी आली आहे. सरकारने आता AICPI-IW इंडेक्सआधारे नवा डीए निश्चित केला असून त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! AICPI-IW इंडेक्सआधारे निश्चित झाला नवा डीए, वेतनात होणार इतकी वाढ
DA Hike Update
| Updated on: Jan 10, 2026 | 5:58 PM

DA Hike Update: नवीन वर्षाची सुरुवात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक असणार आहे. ८ वा वेतन आयोग (8th Pay Commission) च्या स्थापने संदर्भात चर्चा सुरु असतानाच सरकार लवकरच महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याची घोषणा करु शकते.

नवीन वर्षांच्या सुरुवातीसोबतच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच आठवा वेतन लागू होण्याची चर्चा सुरु असताना आहात डीएत देखील वाढ होण्याची बातमी आहे.

DA मध्ये २% वाढीची शक्यता

साल २०२६ च्या जानेवारी महिन्यातच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनर्सच्या वेतनात एक महत्वाची वाढ पाहायला मिळू शकते. बातमीनुसार खालीलप्रमाणे डीएत वाढ होऊ शकते.

सध्याच्या काळात महागाई भत्ता ५८ टक्के आहे. ज्यास वाढवून ६० टक्के केला जाऊ शकते.

ही वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या सध्याच्या ढाच्याच्या अंतर्गत होऊ शकते.

याआधी जुलै २०२५ मध्ये सरकारने डीएला ५५ टक्क्यांवरुन वाढवून ५८ टक्के केले होते.

या वाढीचा आधार काय ?

महागाई भत्ता ( DA ) आणि महागाई दिलासा ( DR ) मध्ये होणाऱ्या या वाढीचा मुख्य आधार ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स ( AICPI-IW ) आहे.

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नोव्हेंबर २०२५ साठी इंडेक्स जारी केला आहे, १४८.२ टक्के आहे.

जुलै ते डिसेंबर २०२५ च्या आकड्यांनी स्पष्ट होते की खाद्य पदार्थ, परिवहन आणि आरोग्य सुविधा सारख्या पायाभूत गरजात सातत्याने खर्च होत आला आहे.

हेच कारण आहे की ७ वा वेतन आयोगाचा कार्यकाळाची औपचारिक समाप्ती ( ३१ डिसेंबर २०२५ ) नंतर देखील महागाईच्या दबावाला कमी करण्यासाठी हे एडजेस्टमेंट गरजेचे मानले गेले आहे.

८ व्या वेतन आयोगाचे स्टेटस काय ?

वास्तविक ७ व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ अधिकृतरित्या पूर्ण झाला आहे. परंतू आठव्या वेतन आयोगाला लागू होण्याची तारीख अजूनही स्पष्ट करण्यात आलेली नाही.अशा काळात २ टक्क्यांची ही संभाव्य वाढ महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या घराचे बजेट सांभाळण्यासाठी मदतगार सिद्ध होऊ शकते.सध्या या वाढीवर सरकारच्या वतीने अधिकृत मोहर लागणे शिल्लक आहे.