Pension Scheme : या योजनेत वर्षाला मिळतील 72 हजार रुपये, पटकन करा अर्ज, होईल फायदा

| Updated on: Jan 01, 2023 | 12:13 AM

Pension Scheme : आयुष्याच्या संध्याकाळी ही योजना करेल मदत..

Pension Scheme : या योजनेत वर्षाला मिळतील 72 हजार रुपये, पटकन करा अर्ज, होईल फायदा
होईल फायदा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : नवीन वर्षात भविष्यातील आर्थिक खर्चासाठी (Financial Expenditure) ही तरतूद करणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेमुळे आयुष्याची संध्याकाळ सुखकर होईल. पण त्यासाठी अर्थातच तुम्हाला भरघोस गुंतवणूक (Investment) करावी लागेल. तरच जोरदार परतावा मिळेल. या योजनेत तुम्ही वार्षिक 72 हजार रुपये प्राप्त करु शकता. त्यामुळे औषधपाण्यावरील खर्च भागविता येऊ शकतो. त्यासाठी वेळेवर कुठे कर्ज मागण्याची गरज भासणार नाही.

पंतप्रधान वय वंदना योजनेत (PMVVY) एकरक्कमी 9 लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी फायदेशीर ठरु शकते. या योजनेत तुम्हाला वार्षिक 72 हजार रुपयांची पेन्शन मिळेल. या योजनेवर LIC सध्या 7.40% वार्षिक व्याज देते.

तुम्ही अर्धवार्षिक व्याजाचा पर्यायही निवडू शकता. तुम्हाला सहा महिन्यासाठी 36 हजार रुपये मिळतील. म्हणजेच दरमहा गुंतवणूकदाराला निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम दरमहा 6 हजार रुपये असेल. LIC च्या योजनेत ही रक्कम तुम्हाला मिळेल.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारच्या या योजनेचा नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे. एलआयसीच्या मार्फत ही योजना राबविण्यात येते. त्यामुळे उतारवयात लोकांना सामाजिक सुरक्षा मिळते. या योजनेतंर्गत पेंशनधारकाला मासिक, त्रैमासिक, सहामही, वार्षिक आधारावर पेन्शन देण्यात येते.

केंद्र सरकार आणि भारतीय आर्युविमा महामंडळ (LIC) ही योजना राबविते. या योजनेत 60 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वयाची वयोवृद्ध नागरीक अर्ज करु शकता. या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत जवळपास 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.

ही योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरते. कारण या योजनेत आता तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला उतारवयात पेन्शनची रक्कम मिळते. पण जी मुळ रक्कम तुम्ही गुंतवली आहे. ती परत मिळते. म्हणजे तुमचा दुहेरी फायदा होतो.

LIC 10 वर्षानंतर एकरक्कमी गुंतवणूक परत करते. तसेच मासिक, त्रैमासिक, सहामही, वार्षिक आधारावर पेन्शन ही देते. अचानक अडचण आल्यास अथवा पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला योजनेत गुंतवलेली रक्कम परत करण्यात येते.