AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI च्या मोठ्या व्यवहारांवर चार्ज, पण विनाचार्ज पैसे कसे पाठवायचे? सर्व मुद्दे जाणून घ्या…

केंद्र सरकारने एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे की,2,000 रुपयांपर्यंतचे सर्व UPI आणि RuPay कार्ड व्यवहार पूर्णपणे मोफत असतील. पण भविष्यात जर यासाठी शुल्क आकारले जाऊ लागले, तरीही मोफत पेमेंट कसे करता येईल हे पाहूयात..

UPI च्या मोठ्या व्यवहारांवर चार्ज, पण विनाचार्ज पैसे कसे पाठवायचे? सर्व मुद्दे जाणून घ्या...
free upi payments
| Updated on: Sep 16, 2026 | 9:21 PM
Share

युपीआयचे मोठे व्यवहारावर कर लादण्याच्या निर्णयाने डिजिटल देवाणघेवाण करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. तसेच युपीआय शुल्का संदर्भात अनेक भ्रम निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारने या स्थितीला स्पष्ट करत अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. या नव्या गाईडलाईननंतर प्रत्येक ग्राहकांना दैनंदिन उपयोगात बिना कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता देवाण-घेवाण जारी ठेवू शकता. परंतू जर युपीआयवर चार्जेस लागले तर कोणत्या पद्धतीने फ्रीमध्ये पैसे पाठवावेत हे जाणून घेऊयात…

नोटिफीकेशन काय म्हणते ?

पेमेंट एण्ड सेटलमेंट सिस्टीम एक्ट 2007 च्या कलम 10A च्या तरतूदीचा वापर करतान अर्थ मंत्रालयाने नवी नियम अधिसूचित केला आहे. या सरकारी आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की कोणतीही बँक वा पेमेंट सेवा प्रदान करणारी संस्था कोणत्याही युजर वा दुकानदाराकडून पैसे पाठवणे किंवा प्राप्त करण्याच्या नावे थेट किंवा अपरोक्षपणे कोणतेही शुल्क वसुल करु शकत नाही. या पावलाने अफवांवर संपूर्णपणे विराम लागला आहे.

पर्सन-टू-पर्सन म्हणजे मित्र आणि नातेवाईकांना ट्रान्सफर

जर तुम्ही कोणत्या मित्र, कुटुंबाच्या सदस्य वा परिचिताला त्याच्या बँक खात्यात पैसे पाठवत असाल तर ही सुविधा संपूर्णपणे शुल्क मुक्त आहे. तांत्रिक भाषेत यास P2P (पर्सन-टू-पर्सन) ट्रान्सफर म्हटले जाते. फोन पे, गूगल पे वा पेटीएम सारख्या कोणत्याही युपीआय ऐप्सचा उपयोग करुन थेट समोरच्याच्या बँक खात्यात वा युपीआय आयडीवर पाठवण्यात येणाऱ्या रकमेवर एक ही रुपया चार्ज नाही कापला जातो.

2000 रुपयांपर्यंत छोटे डिजिटल पेमेंट फ्री

दुकानदार, फळभाजी विक्रेते वा कोणत्याही छोट्या व्यापाऱ्याला 2,000 रुपयांपर्यंतच्या पैशांचे पेमेंट केल्यानंतर संपूर्णपणे झिरो चार्जचा नियम लागू राहिल. देशात होणाऱ्या सुमारे 96 टक्के युपीआय देवाण-घेवाण, 2,000 रुपयांच्या वा त्याहून कमी रक्कमेचे असतात. या मर्यादेपर्यंतच्या सर्व दैनंदिन पेमेंटला सरकारने कायदेशीर सुरक्षा दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कोणत्या चिंते शिवाय डिजिटल देवाण-घेवाण करु शकणार आहेत.

बचत खात्याशी थेट जोडून पेमेंटची सुविधा

नेहमी ई-वॉलेट वा प्रीपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट (PPI)च्या माध्यमातून व्यापारी देवाण-घेवाण केल्यानंतर काही विशेष परिस्थितीत मर्चेंट चार्जचा संबंध येतो. या स्थितीत वाचण्याचा सर्वोत सोपा आणि मोफत मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्या युपीआय ऐप्समध्ये एखाद्या वॉलेटला जोडण्याऐवजी थेट तुमच्या बँकेच्या सेव्हींग्ज अकाऊंटला लिंक ठेवा. बँक खात्यातून होणारे थेट देवाण-घेवाण संपूर्णपणे चार्ज फ्री श्रेणीत येतो.

रूपे डेबिट कार्डचा वापर सुरक्षित आणि फ्री

सरकारच्या अधिसूचनेत RuPay नेटवर्कने संचालित होणाऱ्या डेबिट कार्डने केले जाणाऱ्या पेमेंटना देखील विशेष सुट दिली जाते. जर तुम्ही कोणत्या पीओएस मशीन वा ऑनलाईन पेमेंट होणाऱ्या डेबिट कार्डने केले जाणाऱ्या पेमेंटला देखील विशेष सुट दिली आहे. जर तुम्ही कोणत्या पीओएस मशीन वा ऑनलाईन मर्चेंटला पेमेंट करण्यासाठी रुपे डेबिट कार्ड वा त्यासंबंधी युपीआय पर्यायाची निवड करत असाल तर त्यावर देखील बँक कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यश्र चार्ज वसुल करत नाही. ही पद्धीत सुरक्षित देखील आहे आणि किफायतशीर देखील आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले