Share Investment : अगदी स्वस्तात मिळवा हे रॉकेटसिंग, महिनाभरातच पैसा दुप्पट!

Share Investment : शेअर बाजारातील हे छोटे पॅकेट बडा धमाक करत आहेत, या शेअर्सनी महिनाभरातच गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला आहे.

Share Investment : अगदी स्वस्तात मिळवा हे रॉकेटसिंग, महिनाभरातच पैसा दुप्पट!
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 8:23 PM

नवी दिल्ली : सध्या शेअर बाजारात (Share Market) चढउताराचे सत्र सुरु आहे. त्यातच काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु आहे. परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढत असताना पण बाजाराला मोठी झेप घेता येत नाहीये. पण अशा ही परिस्थितीत बाजारातील दिग्गज शेअरपेक्षा काही छोटे पॅकेट मोठे धमाके करत आहेत. बाजारातील या रॉकेटसिंग शेअर्संनी (Rocket Share) जोरदार कामगिरी बजावली आहे. केवळ एका महिन्यातच या शेअर्सनी गुंतवणूकदारांचा पैसा डबल केला आहे. विशेष म्हणजे हे शेअर 100 रुपयांपेक्षा पण कमी रुपयांचे आहेत. या स्वस्तातील शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केला आहे.

या शेअरची कामगिरी पाहून वेळीच हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओत असता तर जबरी फायदा झाला असता असे तुम्हाला वाटेल. हे पेन्नी स्टॉक (Penny Stock) गुंतवणूकदारांसाठी पैशांचे झाड ठरले आहेत. गुंतवणूकदारांना त्यांचे घर, कारचे स्वप्न साकारण्यासाठी कर्जाची गरज पडली नाही, इतकी छप्परफाड कमाई झाली आहे.

Naturite Agro चा शेअर एक महिन्यांपूर्वी 53.18 रुपयांवर ट्रेड करत होता. आता हा शेअर 134.28 रुपयांवर पोहचला आहे. एकाच महिन्यात या शेअरने 152.50 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला आहे.

हे सुद्धा वाचा

Prime Industries चा शेअर एका महिन्यापूर्वी 24.01 रुपयांवर होता. आता हा शेअर 60.56 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरने एका महिन्यातच 152.23 टक्क्यांची भरारी घेतली. गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

Hemadri Cements हा शेअर एक महिन्यांपूर्वी 8.84 रुपयांवर होता. सध्या हा शेअर 22.23 रुपयांवर ट्रेड करत आहे. एका महिन्यातच या शेअरने 151.47 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.

Swarna Securitie चा शेअर एका महिन्यापूर्वी 48.67 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या हा शेअर 121.12 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 148.86 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.

Vikalp Securitie हा शेअर एक महिन्यापूर्वी 7.14 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या हा शेअर 17.76 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने एका महिन्यात 148.74 टक्क्यांचा फायदा करुन दिला.

Vantage Knowledge हा शेअर एक महिन्यापूर्वी शेअर बाजारात 90.73 रुपयांना मिळत होता. आता हा शेअर 220.05 रुपयांवर आहे. एका महिन्यातच या शेअरने गुंतवणूकदारांना 142.53 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.

Kapil Cotex च्या शेअरने पण अशीच कमाल केली. एका महिन्यात हा शेअर 55.50 रुपयांहून 133.19 रुपयांवर पोहचला. एका महिन्यात गुंतवणूकदारांना 139.98 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

Non Stop LIVE Update
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.