
कोरोना काळात लोकांना विमा पॉलिसीचे महत्त्व समजले आहे. म्हणूनच, गेल्या दोन महिन्यांत विविध विमा योजना घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यात सर्वाधिक संख्या ही आरोग्य विमा घेणारे आहेत.

पण अजूनही बरेच लोक आहे जे विमा मिळवताना एखाद्या कंपनीला चुकीची किंवा महत्त्वाची देत नाही. असे केल्याने त्यांना फार मोठा फायदा होतो आहे, असे त्यांना वाटते. पण तसे अजिबात नाही. जर तुम्ही एखाद्या विमा कंपनीला योग्य माहिती दिली नाही तर आपल्याला तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे अशा 5 गोष्टी जाणून घ्या, ज्या विमा खरेदी करताना प्रत्येकाने कंपनीला सांगितल्या पाहिजेत.

विमा खरेदी करताना जर तुमचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड असल्यास त्याची माहिती कंपनीला आवश्य द्या. कारण जर तुम्ही असे केले नाही आणि कंपनीला याबाबत बाहेरुन माहिती मिळाली तर कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करु शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होईल.

पॉलिसी घेतल्यानंतर किती दिवसात करु शकतो सरेंडर

SBI ग्राहकांसाठी खूशखबर : 2 लाखांचा विमा मोफत मिळणार

दरम्यान विमा कंपन्या क्लेम सेटल करण्यापूर्वी त्या व्यक्तीचा सर्व प्रकारचा वैद्यकीय इतिहास तपासतात. त्यामुळे अशा परिस्थितीत जर आपण योग्य माहिती दिली नसेल तर त्याचे आर्थिक नुकसान तुम्हाला सहन करावे लागते.