उत्तम काम आणि निष्ठेचं बक्षीस! चेन्नईच्या कंपनीने 100 कर्मचाऱ्यांना आलीशान कार भेट, 5 जणांना BMW

| Updated on: Apr 12, 2022 | 6:11 PM

Chennai it company gift 100 cars: चेन्नईतील एका आयटी कंपनीने 100 कर्मचाऱयांना चक्क कार भेटस्वरूपात दिली आहे. या कंपनीत सुमारे 500 कर्मचारी काम करतात. त्यापैकी गेल्या दहा वर्षांपासून कंपनीशी संबंधित असणाऱया 100 कर्मऱ्यांना गाडी भेट देण्यात आली आहे.

उत्तम काम आणि निष्ठेचं बक्षीस! चेन्नईच्या कंपनीने 100 कर्मचाऱ्यांना आलीशान कार भेट, 5 जणांना BMW
कार गिफ्ट करणारी कंंपनी कोणती आहे? जाणून घ्या
Image Credit source: ANI
Follow us on

चेन्नईतील एका आयटी कंपनीने सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची घोषणा केली. कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना नवीन कार भेट देण्यात आली आहे. Ideas2IT असे कंपनीचे नाव आहे. या कंपनीने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भेट दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने कंपनीशी संलग्नीत असलेल्या कर्मचाऱ्यांना ही कार भेट देण्यात येत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. कंपनीच्या वाढीमध्ये कर्मचाऱयांनी मोलाचे योगदान (Contribution)दिले असून कठीण काळातही ते कंपनीच्या सोबत आहेत. कंपनीचे मार्केटिंग हेड हरी सुब्रमण्यम यांनी सांगितले की, कंपनीने जी संपत्ती निर्माण केली आहे त्यावर कर्मचाऱ्यांचाही हक्क आहे यावर आमचा विश्वास आहे. आमच्या कंपनीत सुमारे 500 कर्मचारी काम करतात. त्यापैकी 100 कर्मऱ्यांना गाड्या भेट देण्यात येत आहेत. हे कर्मचारी गेल्या दहा वर्षांपासून कंपनीशी जुळलेले (Matched with the company) आहेत.

कार गिफ्ट मिळाल्यावर कोण काय म्हणालं?

Ideas2IT चे संस्थापक आणि अध्यक्ष मुरली विवेकानंदन म्हणाले की, या कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच कंपनी इथपर्यंत पोहोचली आहे. कंपनी या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देत नाही, तर या कर्मचाऱ्यांनी आपल्या मेहनतीतून आणि समर्पणाच्या जोरावर ही कमाई केली आहे. स्वप्न एकत्र पूर्ण झाले तर संपत्तीची वाटणीही सारखीच होत असते.

विवेकानंद म्हणाले की, सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही एकत्र येऊन वचन दिले होते की, ध्येय गाठले तर या यशाची चव आपण एकत्र घेऊ. कार भेट देणे हे या दिशेने पहिले पाऊल आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही करण्याचा आमचा विचार आहे. कंपनी नेहमीच महागड्या भेटवस्तू देत असते.

कारच काय, सोन्याची नाणीही दिलीत

कंपनीतील कर्मचारी प्रशांतने सांगितले की, जेव्हा तुम्हाला कंपनीकडून काही भेटवस्तू मिळतात तेव्हा खूप आनंद होतो. भेटवस्तू देण्याच्या बाबतीत कंपनी फार पूर्वीपासून उत्कृष्ट आहे. वेगवेगळ्या सणांच्या दिवशी कंपनीकडून आयफोन, सोन्याची नाणी अशा महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. तथापि, भेट म्हणून कार मिळणे ही मोठी गोष्ट आहे.

कंपनीने भेट दिल्या 5 बीएमडब्ल्यू कार

चेन्नईतील आणखी एका आयटी कंपनी kissflow Inc ने आपल्या पाच कर्मचाऱ्यांना BMW प्रिमीयम कार भेट स्वरूपात दिली आहे. भेट दिलेल्या प्रत्येक कारची किंमत एक कोटी रुपये आहे. कंपनीने पाच वरिष्ठ व्यवस्थापन लोकांना ही अद्भुत भेट दिली आहे. त्यांची बांधिलकी आणि निष्ठा लक्षात घेऊन ही भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीचे सीईओ सुरेश संबंधम यांनी सांगितले की, हे पाच लोक कंपनीच्या स्थापनेपासून संबंधित आहेत. त्यांनी कंपनीला सदैव साथ दिली आणि कठीण प्रसंगातही त्यांनी साथ दिली. कोरोनामुळे कंपनीचे खूप नुकसान झाले, पण आम्ही त्यांच्या मदतीने पुन्हा उभे राहिलो.

इतर बातम्या :

अवघ्या 5.35 लाखात घरी न्या Mahindra Thar SUV, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

15,000 रुपयांच्या रेंजमधील टॉप स्मार्टफोन्सवर तब्बल 27 टक्के डिस्काऊंट

इंधन दरवाढीला ब्रेक, सलग सहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या भावात वाढ नाही; सर्वसामान्यांना मोठा दिलासा