AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Second hand Car: अवघ्या 5.35 लाखात घरी न्या Mahindra Thar SUV, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Second hand Car: महिंद्रा थारची (Mahindra Thar) लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही. ही ऑफ रोड एसयूव्ही कार (SUV Car) लोकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यात आता तिच्या बदललेल्या लूकमुळे तरुणांमध्ये ती खूप पसंत केली जाते.

Second hand Car: अवघ्या 5.35 लाखात घरी न्या Mahindra Thar SUV, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Mahindra Thar SUV
| Updated on: Apr 12, 2022 | 3:37 PM
Share

Second hand Car: महिंद्रा थारची (Mahindra Thar) लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही. ही ऑफ रोड एसयूव्ही कार (SUV Car) लोकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यात आता तिच्या बदललेल्या लूकमुळे तरुणांमध्ये ती खूप पसंत केली जाते. परंतु या कारच्या मोठ्या किंमतीमुळे बहुतेक लोक ही कार खरेदी करण्याची आपली इच्छा बाजूला करुन इतर वाहनांकडे वळतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका डीलबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे ही कार घरी आणण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. 6 लाखांपेक्षा कमी पैसे देऊन तुम्ही ही कार घरी आणू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या शानदार डीलबद्दल.

महिंद्राची ऑफ-रोड एसयूव्ही कार थार तिच्या टफ लूकमुळे अनेकांच्या मनावर राज्य करते. पण या कारची सुरुवातीची ऑन-रोड किंमत 45.64 लाख रुपये आहे. पण आज आम्ही तुम्हाला एका सेकंड हँड कार डीलबद्दल सांगणार आहोत.

सेकंड हँड महिंद्रा थार कुठे मिळेल?

महिंद्रा थार सेकंड हँड कंडिशनमधील गाडी कारदेखो नावाच्या वेबसाइटवर लिस्टेड आहे. ही सेकंड हँड कार 2014 मधील मॉडेल आहे. या कारचे अनेक फोटो वेबसाइट्सवर तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यामध्ये कार चारही बाजून नीट पाहता येईल. तसेच या कारमध्ये चांगल्या कंडिशनमधले टायर्स देखील आहेत. ही कार हरियाणाच्या HR 26 RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. डिझेलवर चालणारी ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.

महिंद्रा थार 2014 मॉडेलचे फीचर्स

सेकेंड हँड महिंद्रा थारमध्ये 2498 सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे 105 एचपी पॉवर जनरेट करु शकते. तसेच, ते 247 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ही 7 सीटर कार आहे. काळ्या रंगात येणाऱ्या या कारला 5 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

महिंद्रा थार 2014 ची खासियत

या कारचं टर्निंग रेडिअस 5.25 मीटर आहे आणि समोर डिस्क आहे, तर मागील बाजूस ड्रम ब्रेक्स व्हील आहेत. यामध्ये ट्यूबलेस टायरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये तीन दरवाजे देण्यात आले आहेत. कार 3800 rpm वर 105 Bhp पॉवर जनरेट करू शकते, तर ती 1800-2000 rpm वर 247 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. या कारची उंची 3920 मिमी आहे, तर व्हील बेस 2430 मिमी देण्यात आला आहे.

Second hand Mahindra Thar ची किंमत

सेकंड हँड महिंद्रा थारची किंमत 5.35 लाख रुपये आहे. हे 2014 सालचे मॉडेल आहे आणि या कारने आतापर्यंत 54000 किमी अंतर कापले आहे. ही सेकेंड ओनर कार आहे.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.