Chiana : सोन्याला ड्रॅगनचा विळखा, कोरोनाचा कहर असताना ही चिन्यांच्या उड्या, इतके टन सोने केले खरेदी, कारण तरी काय?

| Updated on: Dec 09, 2022 | 6:06 PM

Chiana : चीनमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत..

Chiana : सोन्याला ड्रॅगनचा विळखा, कोरोनाचा कहर असताना ही चिन्यांच्या उड्या, इतके टन सोने केले खरेदी, कारण तरी काय?
सोन्यावर उड्या
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : जगभरात मंदीची चाहुल लागली आहे. त्यात चीनची अवस्था तर अजून बिकट झाली आहे. कारण कोरोनाने चीनमध्ये पुन्हा डोकं वर काढलं आहे आणि जाचक निर्बंधाविरोधात चीनमधील जनता रस्त्यावर आली आहे. रात्र-रात्रभर चीनच्या रस्त्यावर लोकांची टाळेबंदी विरोधात प्रदर्शन (China Corona Protest) सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध थोडी सैल दिली आहे. परिस्थिती आणीबाणीची असली तरी चीनमध्ये एक गोष्ट मात्र हैराण करणारी आहे, चीन लोकांच्या सोने खरेदीवर उड्या पडल्या आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये चीनने 32 टन सोने (China Gold Purchase) खरेदी केले आहे.

चीन हा जगातील सर्वात मोठा सोने आयातदार आहे. त्यानंतर सोने आयात करण्यात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतीयांचे सुवर्णप्रेम सर्वांनाच माहिती आहे. पण चीनी लोकं भारतापेक्षा काकणभर याबाबतीत पुढे आहे. चीनमध्ये सोन्याची सर्वाधिक आयात करण्यात येते.

चीनची मध्यवर्ती बँक, पीपल्स बँक ऑफ चायनाने (People’s Bank Of Chiana) एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये देशात 32 टन सोने खरेदी करण्यात आले आहे. सप्टेंबर 2019 नंतर तीन वर्षांनी पहिल्यांदा चीनच्या सोने साठ्यात (China Gold Reserve) बदल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

जागतिक सोने परिषदेनुसार, (WGC) ताज्या आकड्यांआधारे चीनकडील सोन्याच्या साठ्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, चीनकडे 1,980 टन सोन्याचा साठा आहे. चीनने सध्या जे 32 टन सोन्याची खरेदी केली आहे, ते 1,650 डॉलर प्रति औसच्या दराने खरेदी केले आहे.

चीनच्या या कृतीने जागतिक समुदाय हैराण आहे. चीन एवढ्या सोन्याची आयात का करत आहे, याचे पुरेसे कारण समोर येत नाही. चीन हा मोठा आयातदार असला तरी, सोन्याची आयात एवढ्या मोठ्या प्रमाणात का करण्यात येत आहे, याची कारणं समोर आलेली नाहीत.

बहुतांश देशाचे भांडवल संतुलित ठेवण्यासाठी सोन्याचा वापर करतात. जागतिक सोने परिषदेनुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत विविध देशांच्या मध्यवर्ती, केंद्रीय बँकांनी 400 टन सोन्याची खरेदी केली आहे. अनेक तिमाहीपेक्षा ही सर्वात मोठी आयात होती.

सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येते. भारतासह चीनमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानण्यात येते. त्याचे धार्मिक चालीरितीशी संबंध आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्याचा हा नवीन ट्रेंड रुढ होत असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे.