AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : ऐन थंडीत सोन्याने फोडला घाम, दरवाढीचा पारा उच्चांकावर, चांदीही मागे नाही, आजचे भाव काय?

Gold Price Today : सोन्याने आणि चांदीने टॉप गिअर टाकल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे..

Gold Price Today : ऐन थंडीत सोन्याने फोडला घाम, दरवाढीचा पारा उच्चांकावर, चांदीही मागे नाही, आजचे भाव काय?
आजचे सोने-चांदीचे दर काय?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 09, 2022 | 5:24 PM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि भारतीय वायदे बाजारात आज, शुक्रवार 9 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या भावात वृद्धी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात (Gold Price Today) सुरुवातीच्या सत्रात 0.14 टक्के तेजी दिसून आली. तर वायदे बाजारात चांदीने ही कमाल केली. चांदीच्या भावात आज (Silver price Today) 0.68 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी सराफा बाजारात सोना आणि चांदीचे दरांनी आगेकूच केली होती.

शुक्रवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या भावात सकाळी 9:20 वाजता, कालच्या बंद भावानंतर 73 रुपयांची वृद्धी दिसून आली. सोन्याचा भाव 54,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आज सोन्याचा भाव 53,999 रुपयांवर सुरु झाला. एकावेळी सोन्याचा भाव 54,201 रुपयांवर पोहचला. त्यानंतर त्यात घसरुन होऊन भाव 54,060 रुपये झाला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीच्या भावात तेजी दिसून आली. चांदीच्या भावात कालच्या तुलनेत 456 रुपयांची वाढ झाली. चांदी 67,490 रुपये भावावर व्यापार करत होती. आजचा चांदीच्या भावात 67,362 रुपयांची वाढ झाली. एकावेळी चांदीचा भाव 67,546 रुपयांवर पोहचला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात वृद्धी दिसून आली. शुक्रवारी सोन्याच्या भावात 0.71 टक्क्यांची वाढ झाली. सोने 1,793.79 डॉलर प्रति औसवर होते. तर चांदीच्या भावाने 2.36 टक्क्यांची उडी घेतली. चांदी 23.26 डॉलर प्रति औसवर आली. गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात 4.79 टक्क्यांची वाढ तर चांदीत 8.12 टक्क्यांची वाढ दिसून आली.

दिल्ली सराफा बाजारात काल, गुरुवारी, सोने आणि चांदीच्या किंमतीत वृद्धी दिसून आली. दिल्लीत सोन्याचा भावात 211 रुपयांची वाढ होऊन ते 54,270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली होती. सोन्याचा भाव 54,054 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?