Gold Price : सोन्यात गुंतवणूक करावी की नाही? पडला संभ्रमात, सूसाट सोन्यावर लावावा का डाव?

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Dec 07, 2022 | 7:02 PM

Gold Price : सोन्यात गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे राहील का?..

Gold Price : सोन्यात गुंतवणूक करावी की नाही? पडला संभ्रमात, सूसाट सोन्यावर लावावा का डाव?
सोन्यात गुंतवणूक करावी?
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याच्या किंमतीत (Gold Price) फारसा चढउतार होत नसल्याचे चित्र आहे. वायदे बाजारात (Commodity Market) सोने तेजीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वृद्धी दिसून येत आहे. परंतु, ही काही फार मोठी वृद्धी नाही. भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याने जोरदार मुसंडी मारली आहे. सोन्यात कमालीची तेजी दिसून आली. त्यामुळे अनेकांनी सोन्यात गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. पण आताच सोन्यात गुंतवणूक करावी की नाही, याबाबत ते साशंक आहेत.

अमेरिकेन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हची पुढील आठवड्यात बैठक होत आहे. त्याचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डमध्ये 0.14 टक्क्यांची वाढ झाली. सध्या सोने 1773 डॉलर प्रति औसवर ट्रेड करत आहे.

पण फेडरल रिझर्व्ह जर व्याज दरात वाढीचा निर्णय घेईल तर त्यावर सोन्यातील गुंतवणूकीचे भविष्य ठरेल. भारतासाठी हा निर्णय महत्वाचा राहील. कारण भारत हा सोन्याचा मोठा आयातदार आहे. चीननंतर भारतात सोन्याची मोठी आयात होते.

हे सुद्धा वाचा

डॉलरचा भाव घसरणीनंतर सोन्यातील गुंतवणूकदारांचा फायदा होतो. एमके वेल्थ मॅनेजमेंटच्या अंदाजानुसार, गेल्या 2-3 आठवड्यात सोन्यात तेजी दिसून येत आहे. सोने आजघडीला 1800 डॉलर प्रति औस पर्यंत पोहचले आहे.

अमेरिकेत महागाई दर 8 टक्क्यांवर आहे. यात वाढ होऊ नये यासाठी फेडरल रिझर्व्ह बँका व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढीची शक्यता कमी आहे. इतर देशांच्या मध्यवर्ती केंद्रीय बँका पण व्याजदर वाढविण्याची शक्यता आहे.

फेडरल रिझर्व्हची बैठक या महिन्यात 13-14 डिसेंबर रोजी होत आहे. घरगुती बाजारात सोन्याचा वायदे बाजारातील भाव 3 फेब्रुवारी 2023 रोजी 53897 रुपये प्रति 10 ग्रॅम सुरु आहे. हा भाव 137 रुपये जास्त आहे.

आजच्या व्यापारी सत्रात सोन्याच्या दर 53908 रुपये उच्चांकी पातळीवर पोहचला. तर चांदीच्या भावात वायदे बाजारात 370 रुपयांची वाढ झाली. चांदी 65784 रुपये प्रति किलोवर व्यापार करत आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI