LPG Price : नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका, LPG महागला, 195 रुपयांची वाढ, घरगुती गॅस…
बुधवारी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात काहीसा दिलासा मिळाला असला तरी, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात यावर्षी पाचवी दरवाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात यावर्षी आधीच अंदाजे 500 रुपयांनी वाढ झाली आहे. नव्या महिन्यापासून कर्मशिअल सिलेंडरचे दर चांगलेच वाढले असून ते 2 हजारांपार गेले आहेत.

मध्यपूर्वेत इराण वि . अमेरिका-इस्रायल असं युद्ध पेटलं असून त्या परिणाम आता जगभरात होत असून लोकांच्या खिशालाही युद्धाचा भार सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे, सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे, त्यानुसार व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 195.50 रुपयांची वाढ केली आहे. बुधवारपासून लागू झालेल्या या नवीन दरांमुळे व्यापारी आणि रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंता वाढली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी दिलेलया माहितीनुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता 2 हजारांपार गेले असून त्यासाठी एकूण 2078.50 रुपये मोजावे लागणार आहेत. याच्या अगदी महिन्याभराआधीच, 1 मार्च रोजी 19 किलोंच्या सिलेंडरची किंमत 114.5 रुपयांनी वाढवण्यात आली होती.
एकीकडे सुरू असलेलं घरगुती गॅस सिलेंडरचे संकट हे काही कोणापासून लपलेलं नाही. सरकारकडून उपलब्धतेबद्दल दररोज जनतेला माहिती दिली जाते, तसेच घाबरून न जाण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. तसंच, पीएनजी कनेक्शन असलेल्यांना त्यांचे गॅस सिलेंडर जमा करण्याचे विशेष आवाहनही केले आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात.
घरगुती गॅसचे दर जैसे थे, व्यावसायिक सिलेंडर महागला
बुधवारी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात काहीसा दिलासा मिळाला असला तरी, यावर्षी त्यात पाचवी दरवाढही झाली आहे. आकडेवारीनुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात यावर्षी अंदाजे 500 रुपयांची वाढ झाली आहे, तर देशभरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर 2 हजार रुपयांच्या वर गेला आहे.
आज फक्त व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजीच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे (एलपीजी) दर, ज्यामध्ये 7 मार्च रोजी 14.2 किलोग्राम सिलेंडरमागे 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती, ते आता स्थिर आहेत. सध्या राजधानी दिल्लीत 14.2 किलोग्राम (घरगुती) सिलेंडरची किंमत 913 रुपये इतकी आहे. कलकत्ता येथे हे दर 939 रुपये, मुंबईत 912.50 रुपये इतके आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि विनिमय दरांच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ATF आणि एलपीजीच्या LPG सुधारित करतात. पश्चिम आशियातील युद्धामुळे ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यापासून जागतिक तेल किमती जवळपास 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
गेल्या वर्षी मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची कपात झाल्यापासून त्यांचे दर स्थिर आहेत; दिल्लीत सध्या पेट्रोल 94.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लिटर आहे.