Ashok Kharat Case | परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका; आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे आंबा, चिकू आणि ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे परिसरात वादळी वाऱ्यामुळे चिकूच्या फळांचा मोठ्या प्रमाणात झाडाखाली सडा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
परभणी जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे आंबा, चिकू आणि ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे परिसरात वादळी वाऱ्यामुळे चिकूच्या फळांचा मोठ्या प्रमाणात झाडाखाली सडा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे दोन एकर क्षेत्रातील चिकू बागेचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी चिकूचे उत्पादन चांगले आले होते, मात्र अवकाळी पावसामुळे संपूर्ण उत्पादनावर पाणी फिरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या नुकसानीमुळे आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून पंचनामे करून पुढील कारवाई केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on: Mar 31, 2026 05:14 PM
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...

