Brihanmumbai Municipal Corporation | मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती, मिळवला हा बहुमान!
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. सध्या पदावर असलेले मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्ती नंतर आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होईल यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चांचा गदारोळ होता. या चर्चेत मिलिंद म्हैसकर, विकास खारगे, संजीव मुखर्जी आणि व्ही. राधा यांची नावे समोर आली होती. मात्र, शेवटी सर्वांना मागे ठेवत अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली.

अश्विनी भिडे 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून मेट्रो लाईन 3 प्रकल्पात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. याशिवाय, त्या मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी करत होत्या. अश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या असून आता शहरातील महानगरपालिकेची सर्वोच्च जबाबदारी त्यांच्या हाती आली आहे.
Published on: Mar 31, 2026 03:15 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..