वर्कफ्रॉम होममुळे कंपन्यांची मोठी आर्थिक बचत; ऑफिस खरेदीवरही परिणाम

| Updated on: Dec 08, 2020 | 3:11 PM

वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आता दृढ होऊ लागल्याने कार्यालयीन जागांच्या मागणीत घट झाल्याची माहिती समोर आली आहे (Corona Pandemic effect on Corporate and Construction Sector)

वर्कफ्रॉम होममुळे कंपन्यांची मोठी आर्थिक बचत; ऑफिस खरेदीवरही परिणाम
Follow us on

मुंबई : जगावर आर्थिक मंदिचं सावट असताना अचानक कोरोना संकट आलं. या संकटाचा सर्वच क्षेत्रातील घटकांना मोठा फटका बसला. या संकट काळात काम बंद पडू नये म्हणून कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचा सल्ला दिला. मात्र, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आता दृढ होऊ लागल्याने कार्यालयीन जागांच्या मागणीत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम क्षेत्रातील कार्यालयीन जागांच्या मालकांना याचा मोठा फटका बसत आहे. मात्र, कंपन्यांची मोठी आर्थिक बचत होत असल्याचं समोर आलं आहे (Corona Pandemic effect on Corporate and Construction Sector).

बांधकाम क्षेत्रातील सल्लागार कंपन्यांच्या माहितीनुसार, पुढच्या दोन वर्षात कार्यालयीन जागांच्या मागणीत 20 टक्के घट होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी पहिल्या 9 महिन्यात देशात 3 कोटी 20 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या कार्यालयीन जागांचे व्यव्हार झाले होते. मात्र, यावर्षी पहिल्या नऊ महिन्यांमध्ये फक्त 1 कोटी 70 लाख चौरस फूट जागांचे व्यव्हार झाले. दूसरीकडे कर्मचारी घरुन काम करत असल्याने अनेक कंपन्यांना अतिरिक्त जागेची गरज भासत नाही. त्यामुळे पुढच्या दोन वर्षात कार्यालयीन जागेच्या मागणीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कंपन्यांची मोठी आर्थिक बचत

कर्मचारी घरुन काम करत असल्याने बऱ्याच कंपन्यांचा पाणी, वीज, कँटीन, पिकअप-ड्रॉपचा खर्च वाचत आहे. घरून काम होत असल्याने आता ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना बोलावण्याची संकल्पना मागे पडत आहे. त्यामुळे ऑफिससाठी अमूक जागा खरेदी करण्याचा कंपन्याचा ओढा कमी झाला आहे.

TCS कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी 2025 पर्यंत वर्क फ्रॉम होमची योजना

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर टाटा कंसल्टेंसी सर्विसेस (TCS) कंपनीने 90 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचा आदेश दिला होता. विशेष म्हणजे त्याआधी 20 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम काम करत होते. कंपनीने ग्लोबल स्थरावर 75 टक्के वर्क फोर्स साठी 2025 पर्यंत वर्क फ्रॉम होमची योजना आखली होती.

फ्लिपकार्टची देखील वर्क फ्रॉम होमची योजना

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने लॉकडाऊन दरम्यान 12 हजार कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कंपनीने आता वर्क फ्रॉम होमसाठी मुदतवाढ दिली आहे. कंपनीच्या या योजनेअंतर्गत कर्मचारी 31 मे 2021 पर्यंत घरुन काम करणार आहेत. टीसीएस आणि फ्लिपकार्टसह अनेक कंपन्यांनी आशाप्रकारची योजना लागू केली आहे.

संबंधित बातम्या : दरवाढीचा भडका! महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोलचे भाव 90 पार; डिझेलही 80च्या पुढे