AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangalsutra : सौभाग्याच्या लेण्यासाठी खर्च झाला कमी, मंगळसूत्र खरेदीत आली स्वस्ताई, पीयूष गोयल यांचा दावा तरी काय?

Piyush Goyal On Mangalsutra : भारतात लग्नकार्यात महिलांसाठी मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं मानण्यात येते. किंमतीपेक्षा मंगळसूत्राशी महिलांची भावनिक सख्य असते. पण तरीही सोन्याच्या वाढत्या किंमती पाहता, मंगळसूत्राची किंमत महाग असते. आता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळसूत्र खरेदी स्वस्त झाल्याचा दावा केला आहे.

Mangalsutra : सौभाग्याच्या लेण्यासाठी खर्च झाला कमी, मंगळसूत्र खरेदीत आली स्वस्ताई, पीयूष गोयल यांचा दावा तरी काय?
मंगळसूत्र झाले की स्वस्त-पीयूष गोयल
| Updated on: Sep 28, 2024 | 5:05 PM
Share

भारतात एका विवाहित स्त्रीसाठी मंगळसूत्र हा सर्वात बेशकिंमती ऐवज आहे. यामध्ये भावनिक नातं जोडलं जाते. मुदुराईच्या मिनाक्षी मंदिरात लग्न झालेल्या महिला त्यांच्या मंगळसूत्राचा स्पर्श देवीच्या चरणाला करतात आणि नंतर हे मंगळसूत्र घालतात. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा वाढत्या किंमतींमुळे मंगळसूत्र तयार करणे हे महागडे झाले आहे. त्यासाठी अर्थातच अधिक रक्कम खर्च करावी लागत आहे. पण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळसूत्र खरेदी स्वस्त झाल्याचा दावा केला आहे. त्याचे कारण तरी काय?

मंगळसूत्र हे काळ्या मन्यांमध्ये ओवून तयार करण्यात येते. पण यामध्ये सोन्याची दोन वाट्या, पेंडेंट असतात. तो या मंगळसूत्राचा मुख्य भाग असतो. काही जणी काळ्या मोत्यांऐवजी सोन्याच्या साखळीचा वापर सुद्धा करतात. भारतात सोने हे आयात करुन आणण्यात येते. बजेटमध्ये मोदी सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. ते आता 6 टक्क्यांवर आणले आहे. जानेवारीमध्ये आयात शुल्क सर्वाधिक होते.

मंत्री गोयल यांचा दावा तरी काय?

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या मते सोन्यावरील आयात शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता सोन्याच्या महागाईची चिंता करण्याची गरज नाही. एका कार्यक्रमात त्यांनी मंगळसूत्र खरेदी स्वस्त झाल्याचा दावा केला आहे. इंपोर्ट ड्यूटी कमी झाल्याने सोन्याच्या किंमतीत कपात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आई-बहि‍णींसाठी आणि देशातील महिलांसाठी सोन्याचे मंगळसूत्र तयार करणे स्वस्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,640, 23 कॅरेट 74,337, 22 कॅरेट सोने 69,286 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,730 रुपये, 14 कॅरेट सोने 44,249 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,448 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Follow Us
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?
शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Raj Thackeray | शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? राज ठाकरेंनी...
Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना...
Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले...
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले, प्रसाद लाड यांना थेट इशारा!
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?