AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 28 September 2024 : सोने आणि चांदीची गरूड भरारी; आता काय किंमती? मौल्यवान धातूत स्वस्ताई कधी?

Gold Silver Rate Today 28 September 2024 : सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढीचे सत्र सुरूच आहे. मौल्यवान धातुत या आठवड्यात दरवाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात पण किंमती वधारल्या होत्या. पितृपक्ष असताना आणि कमी खरेदीदार असताना जागतिक परिणामांमुळे दोन्ही धातूत स्वस्ताई येण्याची कमी चिन्ह आहेत.

Gold Silver Rate Today 28 September 2024 : सोने आणि चांदीची गरूड भरारी; आता काय किंमती? मौल्यवान धातूत स्वस्ताई कधी?
सोने चांदी भाव
| Updated on: Sep 28, 2024 | 8:37 AM
Share

सोने आणि चांदीच्या किंमतीत दरवाढीचे सत्र सुरूच आहे. मौल्यवान धातुत दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात ही दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली होती. तर या आठवड्यात सलग दरवाढीमुळे सणासुदीत ग्राहकांचा खिसा कापल्या जाणार हे स्पष्ट आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात भाववाढ झाल्याने मौल्यवान धातुत स्वस्ताई येण्याची कमी चिन्ह आहेत. बाजारातील तज्ज्ञानुसार आता सणांच्या हंगामात आणि तुळशी विवाहानंतर लग्नसराई येणार असल्याने या धातूत नरमाईची शक्यता कमी आहे. दोन्ही धातू लवकरच सर्वकालीन उच्चांका गाठतील. आता अशा आहेत सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 28 September 2024 )

सोन्याची मोठी उडी

दोन आठवड्यात सोन्याने 2,000 रुपयांहून अधिकची मुसंडी मारली आहे. 23 सप्टेंबर रोजी दर 220 रुपये, 24 सप्टेंबर रोजी 210 रुपये तर 25 सप्टेंबरला 660 रुपयांनी किंमती वधारल्या. 26 तारखेला भाव स्थिर होता. 27 सप्टेंबर रोजी 430 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची मोठी खेळी

गेल्या दोन आठवड्यात चांदीने 6,000 रुपयांची मुसंडी मारली. 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी किंमतीत वाढ झाली नाही. 25 सप्टेंबर रोजी चांदीत 2,000 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर विश्रांती घेत 27 सप्टेंबर रोजी या धातूने 1 हजार रुपयांची वाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,640, 23 कॅरेट 74,337, 22 कॅरेट सोने 69,286 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,730 रुपये, 14 कॅरेट सोने 44,249 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,448 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?

पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण