AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion War : पंजाबमध्ये अफगाणिस्तानाचा कांदा; खडबडून जागे झाले केंद्र सरकार, राज्यात घेतली धाव, आता पुढचं पाऊल काय?

Onion Stock in State : निर्यात बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवरुन वाद सुरू असतानाच पंजाब राज्यात अफगाणिस्तानचा कांदा दाखल झाल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले. नवीन लाल कांदा लागवड, जुना उन्हाळा कांदा आवक यांची माहिती घेण्यासाठी केंद्राचे एक सदस्यी पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. या सदस्याने नाशिकच्या दौऱ्यावर असतांना लासलगाव बाजार समितीत बाजार समिती संचालक, शेतकरी प्रतिनिधी, कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांसोबत एक तास चर्चा केली.

Onion War : पंजाबमध्ये अफगाणिस्तानाचा कांदा; खडबडून जागे झाले केंद्र सरकार, राज्यात घेतली धाव, आता पुढचं पाऊल काय?
कांदा
| Edited By: | Updated on: Sep 27, 2024 | 11:41 AM
Share

अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यात कांदा आयात झाल्याच्या माध्यमांमधून बातम्या येताच केंद्र सरकार खडबडून जागं झाले. केंद्र सरकारने कृषी मंत्रालयातंर्गत शेतकरी कल्याण विभागाचे विपणनचे अर्थ सल्लागार कविरासन या एक सदस्य पथकाला राज्याच्या दौऱ्यावर पाठवले. नाशिक, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये नवीन लाल कांद्याची झालेली लागवड आणि जुना साठवणूक केलेला उन्हाळा कांदा किती शिल्लक आहे याची माहिती हे सदस्य घेत आहेत. देशात कांदा साठा शिल्लक असताना थेट इतर देशात कांदा आणण्यात येत असल्याने कृषी विभाग गांगरून गेला आहे. आता एक सदस्यीय पथक पुढील अहवाल सादर करेल.

शेतकरी, व्यापाऱ्यांशी केली चर्चा

राज्यातील कृषी व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या पथकाने लासलगाव बाजार समितीला भेट दिली. बाजार समिती संचालक, शेतकरी, प्रतिनिधी, निर्यातदार व्यापाऱ्यांशी या सदस्याने एक तास चर्चा करत माहिती जाणून घेतली. हा दौरा संपल्यानंतर कांद्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती एक सदस्य पथकातील कविरासन यांनी दिली.

केंद्राच्या धोरणावर टीका

कांदा लागवड व कांद्याच्या आवकेची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारकडून यापूर्वी चार ते पाच वेळा पथक पाठवण्यात आले. आतापर्यंत या पथका सोबत जी ही चर्चा झाली ती कांद्याचे बाजार भाव कसे नियंत्रणात ठेवता येईल यावरच झाली. त्यांनी आमच्या सोबत चर्चा केली या चर्चेदरम्यान बाजार भाव हे केवळ पंधरा ते वीस दिवसांसाठी वाढतात. यावेळी थोडे फारच दर अधिकचे शेतकऱ्यांना मिळतात, अशी टीका शेतकऱ्यांनी केली.

इतर देशातून कसा कांदा आयात होतो?

हा कांदा जवळजवळ चार ते सहा महिने साठवणूक केलेला असतो. ज्यावेळी निर्यात बंदी होती त्यावेळी शेतकऱ्यांनी कांदा हजार रुपयांनी विक्री केला. आता मूठभर लोकांच्या हातात कांदा शिल्लक असताना निर्यात खुली केली. आता कुठेतरी केंद्र शासन निर्यात करा सांगतोय ही दुर्दैवी बाब आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान सारख्या देशातून पंजाब मध्ये कांदा आयात केला जातोय या कांद्याला आयातीवर शुल्क नाही आणि भारतीय निर्यात होणाऱ्या कांद्यावर 20 टक्के निर्यात शुल्क लावले जाते. केंद्र सरकार पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील शेतकऱ्यांसाठी काम करतोय का असा सवाल बाजार समितीचे शेतकरी प्रतिनिधी संचालकांनी केला आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.