Today Petrol-Diesel Price : धडामधूम! कच्चे तेलाचे भाव गडगडले, स्वस्तात इंधन कधी मिळणार?

| Updated on: Feb 23, 2023 | 8:36 AM

Today Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव आपटले आहेत. कच्चा तेलाचे भाव 2 डॉलरपेक्षा अधिक घसरले आहेत. कच्चा तेलाचे भाव गेल्या महिन्याभरापासून घसरणीवर आहेत. आता देशात पेट्रोल-डिझेलचे भाव कधी कमी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Today Petrol-Diesel Price : धडामधूम! कच्चे तेलाचे भाव गडगडले, स्वस्तात इंधन कधी मिळणार?
सांगा भाव कधी घसरणार
Follow us on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 24 तासात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) गडगडले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) महागाई आटोक्यात आणण्यासाठी आणि डॉलर मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. केंद्रीय बँकेने व्याजदर वाढवले आहेत. कच्चा तेलासह सोने आणि चांदीवर त्याचा दबाव दिसून येत आहे. कच्चा तेलात 24 तासात 2 डॉलरही जास्त घसरण झाली. या मोठ्या घसरणीमुळे अगोदरच कमी असलेल्या किंमती अजून खालच्या स्तरावर पोहचल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव जवळपास 2 डॉलरने घसरत 80.67 डॉलर प्रति डॉलरवर पोहचला. डब्ल्यटीआई ऑईलमध्ये ही 2 डॉलरपेक्षा अधिकची घसरण दिसून आली. हे भाव 74.04 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. कच्चा तेलाचे दर गेल्या महिन्याभरापासून घसरणीवर असताना आता देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कधी कमी होतील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

अमेरिकेत इंधनाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. तर चीन पण तेल आयातीवर भर देत आहे. भारतही या स्पर्धेत आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत कच्चा तेलाच्या किंमती भडकूही शकतात. पण भारताच्या रणनीतीमुळे अमेरिकेच्या धोरणाचा भारतावर परिणाम होणार नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. भारत रशियासह इतर देशांकडून कच्चा तेलाची खरेदी करत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

हे सुद्धा वाचा

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती

मुंबई

पेट्रोल 106.31 प्रति लिटर

डिझेल 94.27 प्रति लिटर

अहमदनगर

पेट्रोल 106.53 प्रति लिटर

डिझेल 93.03 प्रति लिटर

अकोला

पेट्रोल 106.66 प्रति लिटर

डिझेल 93.19 प्रति लिटर

अमरावती

पेट्रोल 107.15 प्रति लिटर

डिझेल 93.66 प्रति लिटर

औरंगाबाद

पेट्रोल 107.71 प्रति लिटर

डिझेल 94.17 प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.45 प्रति लिटर

डिझेल 92.99 प्रति लिटर

नांदेड

पेट्रोल 108.32 प्रति लिटर

डिझेल 94.78 प्रति लिटर

जळगाव

पेट्रोल 106.46 प्रति लिटर

डिझेल 92.98 प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.65 प्रति लिटर

डिझेल 93.15 प्रति लिटर

लातूर

पेट्रोल 107.89 प्रति लिटर

डिझेल 94.36 प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.06 प्रति लिटर

डिझेल 92.61 प्रति लिटर

पुणे

पेट्रोल 106.59 प्रति लिटर

डिझेल 93.09 प्रति लिटर

सोलापूर

पेट्रोल 106.11 प्रति लिटर

डिझेल 92.65 प्रति लिटर